इंजिनियर साठी सेल्स, करीयर म्हणून कितपत योग्य ?

हल्लीच्या बदलत्या काळात करीयरच्या अनेक नवीन वाटा तयार झाल्या आहेत. “इंजिनियरिंग” हे क्षेत्र केवळ इंजिनियरिंग पुरतेच मर्यादीत राहिले नसून अनेक इंजिनियर फायनान्स, कॉस्टिंग तसेच सेल्स अशा निरनिराळ्या करीयरच्या वाटा निवडताना दिसतात. सेल्स हे असे एक क्षेत्र आहे ज्यात प्रगती करण्यास बराच वाव आहे आणि म्हणूनच इंजिनियर या क्षेत्रात जाताना दिसतात. मग खरेच इंजिनियरसाठी हे क्षेत्र निवडणे फायद्याचे आहे का ? तर चला पाहूया.

तुमच्या क्षमता ओळखता येणे

या क्षेत्रात जाऊन तुम्हाला तुमची क्षमता ओळखता येतील. सेल्स मध्ये गेल्याने तुम्ही समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट घेण्यास कसे प्रवृत्त करू शकता याच्या तुमच्या क्षमतेची तुम्हाला ओळख होईल. यामुळे तुम्हाला लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य नक्कीच अवगत होईल. यांतून तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला कामाचा आनंदही घेता येईल.

तुमचे उत्पादन आणि तुमच्या सेवा यांचे संपूर्ण ज्ञान

सेल्स मध्ये असलेल्या व्यक्तीला तुमची कंपनी देत असलेल्या सुविधा आणि बनवत असलेली सगळी उत्पादने यांची योग्य माहिती असावी लागते. तुम्ही जर या क्षेत्रात गेलात तर तुम्हाला संपूर्ण ज्ञान मिळेल आणि प्रक्रीयांचीही माहिती होईल. यांमुळे तुमचे ज्ञानही वाढेल तसेच तुमचे संवाद कौशल्यही. यांमुळे तुमच्या अनुभावातही मोलाची भर पडेल. यांमुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुम्हाला ग्राहकांशी कसे बोलायचे याचे ज्ञान या क्षेत्रा पेक्षा जास्त कुठेही तुम्हाला मिळू शकत नाही.

नेटवर्क

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, मग ते सेल्स असो किंवा आणखी काही, तुम्हाला तुमचा व्यवसाय तसेच तुमचे ग्राहक यांचे एक उत्तम नेटवर्क तयार करणे गरजेचे असते. सेल्स क्षेत्रात काम केल्याने तुमचे नेटवर्क वाढविण्यास तुम्हाला मदत होईल. अनेक कौशल्ये तुम्हाला मिळवता येतील ज्याचा तुमच्या भविष्यात उपयोग होईल. यांमुळे तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे ते समजू शकेल.

मिळकत

या क्षेत्रात तुम्हाला उत्तम अशी मिळकत कमावता येईल. फक्त पगारच नाही तर कमिशन , इंसेन्तीव अशा अनेक रुपात तुम्हाला मिळकत होऊ शकते. जर तुम्ही योग्य ती कामगिरी दाखवलीत तर नक्कीच तुम्हाला भरपूर मिळकत कमावता येईल. बोनस तसेच अनेक वाढीव फायदे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला मिळू शकतात. जितकी मिळकत या क्षेत्रात आहे त्या मानाने कामाचे तास कमी आहेत आणि म्हणूनच हे क्षेत्र तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

स्वातंत्र्य

या प्रकारच्या कामात तुम्हाला आवश्यक ते स्वातंत्र्य मिळते. नऊ ते पाच च्या नेहमीच्या चाकोरीत काम न करता तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. स्वतःचा वेळ हवा तसा वापरून तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकता. तुमच्या कल्पनांचा योग्य पद्धतीने वापर करून तुम्ही तुमचे काम करू शकता. यांत तुमची कल्पनाशक्ती वापरण्याचा संपूर्ण वाव आहे.

जनसंपर्क

सेल्स क्षेत्रात बर्याच लोकांशी तुमचा संपर्क येतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहक मिळू शकतात. यांत तुम्हाला बरेच काही नवीन शिकण्याची संधीदेखील मिळते. नवीन लोकांना बेह्तून त्यांच्याशी बोलून तुम्हाला खूप काही गोष्टी नव्याने शिकता येतील. यांतून तुम्हाला कामाचा आनंद तसेच समाधानही मिळेल. नवनवीन लोकांशी भेटी झाल्याने तुमचा संपर्क वाढेल ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप उपयोग होईल यांत काही शंकाच नाही.

संवाद कौशल्ये

सेल्स या क्षेत्रात सतत ग्राहकांशी बोलावे लागते, संवाद साधावा लागतो, यांमुळे तुमची संवास कौशल्ये तर सुधारतीलच पण तुमचा आत्मविश्वासही वाढेल. यांमुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीचा योग्य पद्धतीने विचार करू शकाल. यात समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट पटवून देण्याची क्षमता वाढू शकेल. यांमुळे तुम्हाला समोरच्या माणसाच्या मनातले कसे जाणून घ्यायचे हेही उत्तम पद्धतीने समजू शकेल. यांमुळे तुमची संवाद कौशल्ये वाढतील आणि तुमच्या व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल घडून नक्कीच येईल.

मार्केट मधील ज्ञान

सेल्समध्ये काम केल्याने तुमचे मार्केटमधील ज्ञान वाढेल. यांत रोजच मार्केटमध्ये जावे लागते किंवा मार्केटशी संबंध येतो. यांमुळे तुम्हाला चालू घडमोडी समजतील आणि त्याबद्दलच्या तुमच्या ज्ञानात भरच पडेल. य्क़ क्षेत्रात तुम्हाला बराच प्रवास करायचा असल्याने निरनिराळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहता येईल. मार्केटचे ज्ञान असल्याने तुमचा बराच फायदा होईल.

कामाचा ताण जाणवणार नाही

आयटी, फायनान्स अशा अनेक क्षेत्रात काम करणार्याला कामाचा फार तणाव असतो परीणामी त्यांच्या आरोग्यावर त्याचा परीणाम होतो. सेल्स मधील कामाचा व्याप जरी जास्त असला तरी त्याचा जास्त तणाव तुम्हाला जाणवणार नाही. ह्या कामात तुम्हाला इतर कामांपेक्षा नक्कीच जास्त आनंद घेता येईल. यांत कामाचे तास हे मर्यादीत असल्याने तुम्हाला नक्कीच सोयीचे होईल.

प्रश्न सोडविण्याची क्षमता

सेल्स हे क्षेत्र खूप जबाबदारीचे असल्याने यांत बर्याच जबाबदार्या स्वीकाराव्या लागतात आणि यांमुळेच तुमची प्रश्न आणि समस्या सोडविण्याची क्षमता वाढते. यांत तुमची निर्णय क्षमताही वाढत असल्याने तुम्हाला भविष्यात नक्की फायदा होईल.

कामाचे सोयीस्कर तास

यांत कामाचे सोयीचे तास असतात त्यामुळे कामाचा ताण असा जाणवत नाही. तुमच्या सोयीने तुम्ही हवे तसे काम करू शकता. यांत तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि म्हणून या क्षेत्रात काम करण्याचा खूप मोठा फायदा आहे. या क्षेत्रात तुम्हाला वाढीचा खूप वाव असून अनेक संधी उपलब्ध आहेत. ह्या क्षेत्रातील नोकरी ही सुरक्षित असते आणि म्हणूनच या क्षेत्रात नोकरी करण्याचा निर्णय हा फायद्याचा ठरू शकतो. ज्या व्यक्तीना लोकांत मिसळणे आवडते त्यांनी या क्षेत्राचा विचार करायला काहीच हरकत नाही.

 स्वातंत्र्य आणि नाविन्य

या क्षेत्रात काम करणार्यांना खूप स्वातंत्र्य मिळते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरू शकता आणि काम करू शकता, तुमच्यातील कल्पकता दाखविण्यास येथे वाव आहे. रोज नवनवीन प्रयोग करून बघता येतात तसेच रोजच्या रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते. हे असे क्षेत्र आहे ज्यातून तुम्हाला इतर क्षेत्रात जाणे  सोपे जाईल.

सेल्स या क्षेत्रात अनेक संधी आहेत तसेच प्रगतीला वावही आहे. जर तुम्हाला रोज काहीतरी नवीन शिकायची इच्छा असेल, स्वतःची प्रगती करायची असेल तर ह्या क्षेत्रात पदार्पण करायला काहीच हरकत नाही. ह्या  क्षेत्रात या आणि उत्तम कामगिरी करा.