उत्तम सॉफ्टवेयर इंजिनियर कसे बनाल?

उत्तम  सॉफ्टवेयर इंजिनियर कसे बनाल?

हल्ली प्रगत तंत्रज्ञानाचा जमाना असल्याने सॉफ्टवेयर क्षेत्रात प्रगतीला खूप वाव आहे. जर काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात तर नक्की तुम्ही उत्तम  सॉफ्टवेयर इंजिनियर  बनाल. आम्ही येथे काही महत्वाच्या गोष्टींची यादी केली आहे ती तुमच्या उपयोगी नक्की पडू शकेल.

वेळ द्या

भरपूर वेळ देणे या क्षेत्रात अपेक्षित आहे. तुम्ही जितका जास्त वेळ देऊन काम कराल तितकी तुमची प्रगती होईल. यात जितके जास्त तुम्ही शिकून घ्याल तितकी प्रगती नक्की कराल. यांत संयम ठेवणे तितकेच गरजेचे आहे. तुमच्याकडे उत्तम निर्णय क्षमता तसेच उत्सुकता असेल तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता.इथे शिकण्यासारखे खूप काही आहे फक्त तुम्हाला त्यासाठी भरपूर वेळ देणे खूप आवश्यक आहे.

सीएसफिफ्टीएकस कोर्स

हा एक मोफत कोर्स आहे ज्यात तुम्हाला फार मोलाचे मार्गदर्शन मिळू शकते. यांत तुम्हाला काही कम्प्युटरच्या भाषा तसेच इतर संबंधित गोष्टींची माहिती नक्की मिळू शकते. हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. नुसता हा कोर्स पूर्ण करून उपयोग नाही, शिकलेले कृतीत आणणे जास्त महत्वाचे आहे. हा कोर्स झाल्यांवर त्यातील ज्ञानाचा तुमच्या कामाच्या ठिकाणी उपयोग जरूर करा.

हेकररंक

ही आणखी एक मोफत सुविधा आहे ज्यात तुम्हाला अनेक अल्गोरिदमची गणिते मिळतील. ही गणिते सोडवून तुम्हाला खूप शिकायला मिळेल. तुमची आवडती प्रोग्रामिंग भाषा वापरून तुम्ही त्याच्या उत्तराचा अवलंब करू शकता. तुम्ही गणित सोडवून आलेले उत्तर हे बरोबर आहे की नाही हेही ततुम्हाला आपोआप समजेल. यांत निरनिराळ्या पातळ्या आहेत आणि तुम्ही सगळ्यात सोप्या पातळी पासून सुरु करू शकता. नंतर तुम्हाला सवय झाल्यानंतर तुम्ही काठीण्य पातळी वाढवू शकता आणि गणिते सोडवू शकता.

तुम्ही तुमच्या आवडीची गणिते निवडून ती सोडवू शकता. जर तुम्हाला गणिते सोडवण्याची आवड असेल तर नक्की ह्याचा तुम्हाला उत्तम प्रकारे उपयोग होऊ शकतो.

कोडींग शिका

तुम्हाला अर्ज केलेल्या नोकर्यांमध्ये काही कोडींग चेलेंज पास करावे लागतील. यांतून ते तुमची प्रोब्लेम सोडवण्याची कौशल्ये तपासतात. ही प्रक्रिया काही ठिकाणांमधून सुरु होते. काही टूल्सच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरु होते. जितके जास्तीत जास्त गणिते तुम्ही सोडवाल तितक्या तुम्हाला  नोकरी मिळण्याच्या शक्यता वाढतात. यासाठी कोडींग शिकणे आवश्यक आहे पण ते कठीण नाही. मनापासून प्रयत्न केल्यास नक्की कोडींग तुम्ही शिकू शकता. ह्यासाठी तुमच्याकडे कोणतीही सॉफ्टवेयर डेवलपर पदवी नसेल तरी हरकत नाही. थोड्या प्रशिक्षणानंतर तुम्ही हे चांगल्या पद्धतीने करू शकता. तुम्ही स्वतः हे तंत्रज्ञान शिकून घेऊ शकता आणि त्यासाठी निरनिराळे कोर्सही उपलब्ध आहेत. कोडींग बाबत अनेक विविध ऑनलाईन रिसोर्स आहेत.याची स्वतंत्र लिस्ट आहे. त्याचा वापर करून तुम्ही उत्तम प्रकारे कोडींग शिकू शकता. हे शिकल्याने तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचा वापर तुमच्या नोकरीसाठी करू शकता.

कोडींग गेम

हा एक खूप उत्तम असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही विडीयो गेम्सच्या माध्यमातून कोडींग करू शकता. सगळ्यात महत्वाचा फरक असा की यांत  तुम्हाला त्वरित अभिप्राय दृश्य स्वरुपात तुम्ही जो कोड लिहित असाल त्याच्या माध्यमातून  मिळू शकतो. यातून तुम्ही अनेकविध  प्रकारचे  अलोगोरीदाम शिकू शकता, काही असे अल्गोरिदम ज्याचा कंपनीला शोध असतो. हे एक उत्तम असे साधन आहे.

फ्री कोड कॅम्प

ही एक मुक्त कम्युनीटी  आहे जिथे तुम्हाला कोडींग कसे करायचे हे शिकायला मिळेल. यांत तुम्हाला वेब डेवलपमेंट शिकायला मिळेल. तुम्ही काही चांगल्या प्रोजेक्ट मध्येही सहभागी होऊ  शकता.

स्टॅकओव्हरफ्लो

ही सगळ्यात मोठी प्रश्न उत्तर समिती आहे जी सॉफ्टवेयर डेवलपमेंट संबंधित आहे. यांत अनेक प्रश्न आहेत ज्यांचा तुम्हाला उपयोग होईल. एकदा तुम्हाला आत्मविश्वास वाटू लागला आणि अनुभव आला की तुम्ही यांत जास्तीत जास्त काम करू शकता.एकदा का तुम्ही थोडे कोडींगचे प्रशिक्षण घेतले, की तुम्हाला  त्यात मजा येईल.यांत अनेक ऍडवान्सड टॉपिक्स आहेत जसे की डेटाबेस, क्रयप्टोग्राफी, वगैरे. हा एक अति उत्तम मार्ग आहे त्यांच्यासाठी ज्यांना कम्प्युटर सायन्समध्ये एक उत्तम असा कोर्स वेळेत पूर्ण करायचा आहे. एकदा एक जोन वशं नावाचा मुलगा होता ज्याला गुगल मध्ये काम करायचा खूप कंटाळा येत होता. त्याने एक महत्वपूर्ण लिस्ट तयार केली जिचा  उपयोग गुगलमध्ये काम करताना होतो. त्याला दुर्दैवाने नंतर नोकरी मिळाली नाही पण या यादीचा इतरांना उपयोग नक्कीच होऊ शकतो.

योग्य संगणक भाषा

यासाठी तुम्हाला निरनिराळ्या संगणक भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कोणती भाषा हे त्या प्रोजेक्टवर अवलंबून आहे. वेगवेगळ्या भाषांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. या कोर्स साठी कोणतेही वयाचे बंधन नाही, कोणत्याही वयात हे करीयर तुम्ही सुरु करू शकता.

 कोड वाचायला शिका

जर तुम्ही कोड वाचायला शिकलात तर  तुमचे काम सोपे होईल. अनुभवी डेवलपर्सचा सल्ला या बाबतीत नक्की घ्या. काही उपयुक्त साईट्स ना भेट देऊन हे काम तुम्ही नक्की करू शकता.

काही चांगली प्प्रोजेक्ट स्वतः तयार करा

तुम्ही स्वतः चांगली काही प्रोजेक्ट तयार करा ज्यातून तुम्हला खूप काही शिकायला मिळेल तसेच अनुभवही मिळेल. तुम्हाला जी संगणक भाषा चांगल्या पद्धतीने येते किंवा तुम्हाला नीट जमते त्या भाषेत हे कोड्स वापरून प्रोजेक्ट तयार करू शकता’. यांतून तुमचे स्वतःचे नेटवर्क सुद्धा तयार होईल.

उत्तम  सॉफ्टवेयर इंजिनियर काय करतात

एक चांगला सॉफ्टवेयर इंजिनियर होण्यासाठी एक उत्तम प्रोग्रामर होणे आवश्यक आहे तसेच त्याला डेटा स्ट्रक्चर चे ज्ञान असणे खूप आवश्यक आहे. अल्गोरिदम चे ज्ञान असणे ही तितकेच आवश्यक आहे. विविध डिझाईनची माहिती त्याला असेल तर नक्कीच फायदा आहे. विविध फ्लो चार्ट किंवा आकृत्या तयार करून त्या माध्यमातून कागदपत्रे त्यात करणे हे त्याचे मुख्य काम आहे. सॉफ्टवेयर इंजिनियरिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात युजरच्या आवश्यकतेनुसार सॉफ्टवेयर तयार आणि  डिझायनिंग वगैरे केले जाते.

इंटरनशिप

तुम्हाला नोकरी करण्याआधीइंटरनशिप  करणे आवश्यक आहे. ही शिकण्याची एक उत्तम संधी आहे. अनेक  मोठ्या कंपन्या अशा संधी उपलब्ध करून देत असतात. यांत तुम्हाला पउत्तम असं प्रशिक्षण मिळते ज्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. याचा कालावधी साधारणपणे तीन ते सहा महिने इतका असतो आणि यातुन तुम्हाला उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यांनतर तुम्ही नोकरीच्या संधी शोधू शकता. यांत पूर्ण वेळ तसे अर्ध वेळ अशा संधी उपलब्ध आहेत. तुमचे स्वतःचे नेटवर्क असले तर त्याचा  फायदा नक्की तुम्हाला होऊ शकतो.

या क्षेत्रातील जॉब्स कसे शोधाल ?

या क्षेत्रातील जॉब्स मिळणे कठीण असले तरी अशक्य नाही. योग्य त्या पद्धतीने प्रयत्न केल्यास तुम्हाला नक्की चांगला जॉब मिळू शकतो. तुमच्या नेटवर्क मधील लोकांच्या मार्फत नक्की तुम्हाला योग्य तो जॉब मिळेल. सॉफ्टवेयर डेवलपर जॉब्सच्या संधी तुम्ही येथे मिळवू शकता. अनेक अशा जॉब साईट आहेत जिथे नोंदणी करून तुम्ही तुमच्यासाठी योग्य अशी नोकरी मिळवू शकता. Mintly.in सारख्या अनेक उत्तम साईट्स तुम्हाला एक उत्तम नोकरी मिळविण्यास मदत करू शकतात. येथे नोंदणी करून तुम्ही उत्तम नोकरी मिळवू शकता. आजच त्यासाठी साईन उप करा आणि तुमच्यायोग्य जॉब मिळवा.

ह्या क्षेत्रात नोकरी मिळविल्यावर काय कराल ?

ह्या क्षेत्रात नोकरी मिळविल्यावर तुम्हाला सर्व यंत्रणा शिकून घेणे आवश्यक आहे. या साठी अनुभवी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. नोकरी ला लागल्यावर तुमचा विकास कसं अहोईल याकडे लक्ष द्या जेणेकरून तुमची बढती होईल आणि करत असलेल्या कामाचा आनंद उम्हला चांगल्या पद्धतीने घेता येईल.