कॅनडा येथे नोकरी का शोधाल ? पाच सर्वोत्तम कारणे.

कॅनडा येथे नोकरी का शोधाल ? पाच सर्वोत्तम कारणे.
Tejashree
Tue, 09/24/2019 – 04:33

 कॅनडा येथे नोकरी का शोधाल ? पाच सर्वोत्तम कारणे.

कॅनडा हा असा देश आहे जिथे लाखो लोक दरवर्षी नोकरीसाठी स्थलांतर करतात. अनेक लोक येथे असलेल्या उत्तम सोयीसुविधांमुळे येथे नोकरी करणे पसंत करतात. येथे नोकरी करणे हा एक उत्तम अनुभव ठरू शकतो. मग आता पाहूया काय अशी कारणे आहेत ज्यासाठी तुम्ही कॅनडा येथे नोकरीसाठी स्थलांतर करण्याचा विचार करू शकता. 

नोकऱ्यांची उपलब्धता 

या देशात नवनवीन नोकरीच्या संधी रोजच तयार होत असतात आणि येथे बेरोजगारी इतर देशांच्या तुलनेत  कमी आहे. या देशाची प्रगती वेगाने होत असून प्रगत तंत्रज्ञान संदर्भात या देशाने सर्वोत्तम क्रमांक पटकावला आहे. यांमुळेच आयटी तसेच कॉम्प्यूटर क्षेत्रातील लोकांना येथे खूप वाव आहे. जर तुमच्याकडे योग्य वर्क परमिट असेल तर तुमचा जोडीदार किंवा कुटुंबातील अन्य व्यक्ती येथे नोकरी करू शकतात. त्यांना स्वतःचे वर्क परमिट मिळवावे लागेल पण कोणत्याही जॉब ऑफरशिवाय ते या देशात कोणतीही नोकरी मिळवू शकतात. मुलांना शालेय शिक्षण मोफत मिळू शकेल आणि अनेक असे मुद्दे आहेत ज्यासाठी इथे नोकरी करण्याचा तुमचा निर्णय योग्य ठरू शकतो. 

आरोग्य आणि इतर सुविधा 

या देशात अनेक उत्तम आरोग्य सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांसाठी विविध आरोग्य प्लान्स सवलतीच्या दरात उपलब्ध करून देते. 

धोरणे

कंपनीच्या व्यवस्थापनाचे उत्तम धोरण हे अजून एक कारण आहे ज्यासाठी तुम्ही या देशात नोकरी करण्याचा विचार करू शकता. गरोदर स्त्रियांना सवलत दिली जाते  तसेच डिलिवरी झाल्यांनतर  भरपगारी रजा याबाबतीत या देशात खूप उत्तम धोरणे आहेत. येथे गरोदर स्त्रियांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात ज्यात आहार, व्यायाम यांबद्दल सांगितले जाते. 

 

राहणीमान व सुरक्षितता 

येथील राहणीमान इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आहे. अन्न, वाहतुकीच्या सोयी यासुद्धा स्वस्त असल्याने येथे राहून नोकरी करणे फायद्याचे ठरू शकते. येथील गुन्हेगारीचे प्रमाण बरेच कमी असल्याने हा देश हे नोकरी करणे तसेच राहाणे यांसाठी एक सुरक्षित ठिकाण ठरले आहे. 

वैविध्य आणि प्रगती 

या देशातील नोकर्यांच्या उपलब्धतेमुळे तसेच इतर अनेक गोष्टींमुळे गेल्या अनेक वर्षांत येथे विविध देशांतील लोक स्थलांतर करून आले आहेत आणि म्हणून इथे वैविध्य टिकून आहे. यांमुळेच येथे संस्कृतीचे जतन होताना दिसते. ज्या झपाट्याने या देशात प्रगती होत आहे त्यापद्धतीने येथे नोकरी करणे फायद्याचे नक्कीच ठरू शकते. येथे उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधा उपलब्ध असल्याने तुमच्या कुटुंबासह येथे स्थलांतर करणे हा एक योग्य निर्णय ठरू शकतो. येथील हवामानही उत्तम असल्याने उत्तम जीवनशैलीसह तुम्ही येथे काम करू शकता. 

 

कॅनडा येथे नोकरी कशी शोधाल 

हल्लीच्या युगात नोकरी मिळविण्याच्या नवनवीन संकल्पना समोर येत आहेत. पूर्वीसारखे फक्त पेपरच्या जाहिराती पाहून मुलाखतीला जाणे आता इतिहासजमा झाले आहे आणि लोक नवनव्या तंत्रांचा वापर नोकरी शोधण्यासाठी करत आहेत. ही नवीन तंत्रे त्यांना सोयीची आणि फायदेशीर वाटत आहेत. तुम्हाला जर योग्य ती नोकरी कमी वेळात मिळवायची असेल तर या नवीन तंत्रांचा वापर नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. 

संदर्भ

काही अशा कंपन्या असतात ज्या कंपनीतील योग्य पदासाठी  योग्य तो यशस्वी उमेदवार रेफर करणाऱ्या कर्मचार्याला काही मानधन देऊ करतात. यांमुळे प्रोत्साहन तर मिळतेच पण कंपनीचे पैसे वाचतात.  जर तुम्हाला कोणी एखाद्या रीक्त जागेसाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रण पाठवले आणि तुम्ही ती नोकरी यशस्वीरीत्या मिळवू शकलात तर तुमचेही नोकरी शोधण्याचे कष्ट वाचतात आणि ज्याने तुम्हाला ही नोकरी मिळवून दिले आहे त्याला बोनस मिळतो. दुहेरी फायदा असल्याने तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकता. जर तुमच्या वर्तुळातील कोणी असे आहे जे नामवंत कंपनीत आहे तर त्यांना तुम्ही तुमच्याबद्दल माहिती द्या, आणि हे सांगा कि तुम्ही कोणत्या प्रकारची नोकरी शोधत आहात. यांमुळे जर त्या व्यक्तीच्या माहितीत कोणती नोकरी असेल तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 

वेबसाईट

हल्ली अशा अनेक वेबसाईट्स आल्या आहेत ज्या उमेदवारांना योग्य ती नोकरी  मिळवून देण्यासाठी तसेच कंपनीला योग्य असे उमेदवार निवडून देण्यास मदत करतात. फक्त नोकरी  नाही तर तुमचा बायोडेटा लिहिण्यापासून ते मुलाखतीच्या तयारीपर्यंत लागेल ती सगळी मदत या साईट्स तुम्हाला करतात. यांपैकी अनेक साईट्स ही सेवा मोफत पुरवतात. अनेक नामवंत कंपनीच्या नोकर्या या साईट्स वर उपलब्ध असतात.अशा साईटवर तुमच्या गरजेप्रमाणे फिल्टर करून नोकरी शोधण्याची सोयही असते. ज्यामुळे तुम्ही फक्त तुमच्यायोग्य नोकर्या पाहून तिथे तुमचे लक्ष केंद्रित करू शकता. .ज्या कंपनीत तुम्हाला काम करायची इच्छा असेल त्या कंपनीच्या साईटवर जाऊन तुम्ही करियरच्या काही संधी आहेत का तेही पाहू शकता.

मेळावे

अनेक ठिकाणी जॉब फेयर अर्थात मेळावे भरतात आणि त्याची जाहिरातही केलेली असते. अशा ठिकाणी जाऊन तुम्ही निरनिराळ्या संधींची  माहिती करून घेऊ शकता तसेच अनेक मोठ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींना भेटू शकता ज्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. येथे तुमच्या अनेक ओळखी होतील ज्याचा भविष्यात तुम्हाला उपयोग  होऊ शकतो. अशा मेळाव्याला जाताना तुम्ही तुमच्या बायोडेटाच्या प्रती घेऊन जाऊ शकता. तिथे जाऊन तुम्ही महत्वाच्या व्यक्तींना भेटू शकता. त्यांनतर तुम्हाला मुलाखतीचे बोलावणे येऊ शकते. अशा मेळाव्यांची माहिती वेळोवेळी वृत्तपत्रात येत असते.

एजन्सी

काही एजन्सीस्वरे तुम्हाला मदत मिळू शकते. या एजन्सीमध्ये तुम्ही तुमचे नाव नोंदवू शकता. तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारची नोकरी हवी आहे हे जर त्यांना तुम्ही सांगितलेत तर नक्की तुम्हाला मदत होईल. नोकरी मिळाल्यावर पहिल्या पगारातील काही हिस्सा मानधन म्हणून ते तुमच्याकडून घेतात. योग्य अशा ठिकाणी  ते तुमची मुलाखत आयोजित करतात. तुम्हाला नोकरी मिळाल्यास त्यांना मानधन द्यायचे असते. अनेक चांगल्या मोठ्या कंपन्या ह्या अशा ठिकाणहून भरती करतात म्हणून तुम्ही इकडून प्रयत्न केलेत तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. अशा एजन्सी  मध्ये तुम्ही तुमचे नाव नक्की नोंदवा कारण तुम्हाला योग्य ती मदत नक्की मिळू शकते. नाव नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला विविध उपलब्ध नोकऱ्यांची माहिती या ठिकाणहून मिळेल. 

चार्टड अकौंटंट

तुमच्या ओळखीत जर एखादा चार्टर्ड अकौंटट असेल तर तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. अशा लोकांचे क्लायंट हे मोठमोठ्या कंपन्या असतात त्यामुळे त्यंच्या ओळखीतून नक्कीच तुम्हाला योग्य ती नोकरी मिळवता येऊ शकते. ते तुम्हाला आधी मुलाखतीला पाठवतील. जर तुमची निवड झाली तर तुम्ही नोकरीला सुरुवात करू शकता. 

कॅनडा येथे योग्य नोकरी मिळवणे हे सोपे काम नव्हे पण जर तुम्ही योग्य ती दिशेने  प्रयत्न केलेत तर यश  नक्की तुमचेच असेल. एक चांगली नोकरी तुमचे भविष्य नक्की उज्वल करेल. 

 

Language