टेरीटरी सेल्स एक्सएक्युटीव्ह, कामाचे स्वरूप, इंटरव्यूच्या काही टिप्स आणि इतर महत्वाच्या गोष्टी.

सेल्स एक्झेक्यूटीव हा एक खूप महत्वाचा आणि जबाबदारीचा जॉब आहे. या जॉबमध्ये  तुम्ही योग्य प्रकारे काम केलेत तर नक्की तुम्हाला बढती मिळू शकते. ह्या प्रकारच्या कामात प्रगतीला खूप वाव आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने काम केलेत तर तुमचा फायदा नक्की होऊ शकतो.

कामाचे स्वरूप

कंपनीचा सेल वाढवणे हे या पदाचे मुख्य काम आहे. ह्या पदावर काम करणारा माणूस हा खूप सक्षम असायला हवा. योग्य ठिकाणी योग्य वस्तू वेळेत पोहोचली गेली पाहिजे आणि त्यासाठी या पदावरील व्यक्तीला योग्य पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. ही डिलिवरी करताना त्याने हे पाहिले पाहिजे की नेताना वस्तू नीट राहाते आहे आणि तिचे कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. या प्रक्रीयेत वस्तूची नीट काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. जर तुम्हाला एखादे वाहन चालवता येत असेल तर उत्तम होईल जेणेकरून इच्छित स्थळी वस्तू पोहोचवण्याचे काम तुम्ही वेळेत करू शकाल. या पदावरील व्यक्तीला वेळेचे नियोजन अगदी योग्य प्रकारे करता आले पाहिजे. जर एकाच वेळी अनेक वस्तू पोहोचवायच्या असल्यास त्यांची वर्गवारी केली तर काम नक्की सोपे होईल. त्या वस्तूंशी संबंधित कागदपत्रे तसेच पावती वगैरे इतर गोष्टी पूर्ण करणे ही सुद्धा या पदावरील व्यक्तीची एक मुख्य जबाबदारी आहे.

पात्रता

या कामासाठी शैक्षणिक पात्रतेची फारशी अट नसली तरी तुमच्याकडे बाकी सगळ्या क्षमता असणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास उत्तम. जर ग्राहक काही तक्रार करत असतील तर त्याचे निवारण योग्य पद्धतीने करता येणे आवश्यक आहे. हे सगळे करताना आलेल्या अडचणींना हसतमुखाने तोंड देता येणे फार आवश्यक आहे. तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल, तुमच्याकडे सेल्स मधली एखादी पदविका असेल, आणि उत्तम संवाद कौशल्ये असतील तर ते पुरेसे आहे. तुम्ही एक उत्तम टेरीटरी सेल्स एक्सएक्युटीव्ह बनू शकता. या क्षेत्रात एखादी पदविका घेतली असेल तर त्याचाही फायदा तुम्हाला नक्की होईल.

या क्षेत्रात कसे पगार मिळतात? बढतीला वाव किती आहे ?

या क्षेत्रात पाउल ठेवणार्यांना हा पहिला प्रश्न पडतो की या क्षेत्रात चांगला पगार मिळेल की नाही ? आणि मिळेल तर किती ? तसे पाहायला गेले तर या क्षेत्रात चांगल्या भक्कम पगाराचे जॉब्स उपलब्ध आहेत, इतकेच नाही तर तुम्ही चांगली कामगिरी करून दाखवलीत तर तुम्हाला बोनस, किंवा काही बक्षिसे वगैरे अनेक गोष्टी मिळतील. यांत काम करणाऱ्या फ्रेशरला सुद्धा महिन्याला २०००० पर्यंत पगार मिळतो. तुमचा जितका जास्त अनुभव तितका जास्त टेरीटरी सेल्स एक्सएक्युटीव्हचा पगार तुम्ही या क्षेत्रात मिळवू शकता.

सेल्स हे क्षेत्र बहरत जाणारे आहे, प्रगतीशील आहे. या क्षेत्रात उत्तम नोकरी योग्य प्रयत्नांनी तुम्ही मिळवू शकता. आता पाहूया या क्षेत्रात नोकरी अशी मिळविता येईल ते.

योग्य ते संशोधन  करा

तुम्ही योग्य कंपन्यांची  नावे शोधून काढू शकता आणि त्यांना संपर्क करा. तिकडे अर्ज करण्याआधी त्यांच्या गरजा आणि अपेक्षा काय आहेत ते पाहून घ्या. जर तुम्हाला योग्य वाटले तर तुम्ही त्या त्या ठीकाणी अर्ज करू शकता.

तुमच्या ब्रांड ची ओळख करून घ्या

तुमचे संशोधन करून झाले की तुम्हाला तुमच्यात असलेले गुण आणि कौशल्ये ओळखायची आहेत. तुमच्याकडे संवाद कौशल्य, भाषाशैली वगैरे आहे का हे तपासून पाहा.

तुमचा प्रोफाईल बनवा

तुमच्या प्रोफाईलने उत्तम प्रभाव पडतो आणि म्हणून तो योग्य प्रकारे बनविणे आवश्यक आहे. त्यात सगळ्या गोष्टी मुद्देसूद लिहा. योग्य पद्धतीने सजविलेल्या प्रोफाईलचा प्रभाव पडतोच. महत्वाचे मुद्दे यांत समाविष्ट करून तुम्ही तुमची नक्की  छाप पाडू शकता.

स्वतःचे नेटवर्क तयार करा

तुमचे स्वतःचे नेटवर्क तयार करा ज्याचा उपयोग तुम्हाला  होऊ शकेल. या नेटवर्कमध्ये महत्वाच्या व्यक्ती तसेच कंपन्यांचा समावेश असेल तर नक्की फायदा होईल आणि तुम्हाला नोकरी मिळणे सोपे होईल. यांत तुम्ही तुमचे मित्र आणि नातेवाईक यांनाही समाविष्ट करू शकता. अशा अनेक विविध कंपन्या असतात जिथे काही कर्मचारी रेफरल प्रोग्राम असतात. कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी जर नवीन उमेदवार कंपनीला मिळवून दिले तर त्यांना बक्षिसे मिळतात. तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो आणि त्याच वेळी तुमच्या मित्रांनाही.

तुमची ऑनलाइन उपस्थिती वाढवा

तुम्ही जर वेगवेगळ्या जॉब्स साईट्स वर अर्ज केलात तर तुम्हाला नोकरी मिळण्याच्या शक्यता वाढतात. निरनिराळ्या अशा साईट्स आहेत जिथे तुम्ही अर्ज करू शकता. लिंक्ड इन किंवा mintly.in अशा ठिकाणहून तुम्हाला नोटिफिकेशन येतील तिथे लक्ष असू द्या. त्यासाठी तुम्ही सतत ऑनलाइन असणे गरजेचे आहे.

इंटरव्यूसाठी काही महत्वाच्या टिप्स

या क्षेत्रात इंटरव्यू जो घेतला जातो तो थोड्या  वेगळ्या पद्धतीने घेतात. तुम्हाला हुशारीने प्रश्नांची उत्तरे देता आली तर निश्चितपणे तुम्ही यात पास होऊ शकता. येथे आम्ही काही उपयुक्त टिप्स दिल्या आहेत ज्याचा वापर करून तुम्ही नक्की इंटरव्ह्यू मध्ये बाजी मारू शकता.

कपडे टापटीप असू द्या

तुमचे कपडे हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो आणि म्हणूनच नीटनेटके कपडे घालून जाणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचा चांगला प्रभाव पडेल. फॉर्मल प्रकारचे कपडे घालून तुमची चांगली ओळख निर्माण करा.

विचार करून बोला

उत्तर देताना घाई करू नका. प्रश्न पूर्णपणे ऐकून घ्या आणि विचार करून उत्तर द्या. उत्तर देताना नेमके आणि स्पष्ट उत्तर द्या. महत्वाचे मुद्दे योग्य पद्धतीने मांडा.

आत्मविश्वास

प्रश्न विचारताना गोंधळून जाउ नका तुमच्यातील आत्मविश्वास दिसू द्या. हे जास्त महत्वाचे आहे.

संयम ठेवा

प्रश्न विचारताना मुद्दाम गोंधळात टाकणारे प्रश्न विचारले जातील. अशा वेळी संयम ठेवून  विचार करून नीट उत्तरे द्या.

सकारात्मक दृष्टी ठेवा

उत्तरे देताना कोणत्याही  नकारात्मक गोष्टी सांगू नका. सकारात्मक पद्धतीने उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.

मुद्देसूद उत्तरे द्या

विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मुद्देसूद उत्तरे दिलीत तर प्रभाव नक्की पडेल. आकर्षक पद्धतीने उत्तरे देण्याचा  प्रयत्न करा म्हणजे तुमचा फायदा होईल.तुम्हाला जर कोणता वेगळा प्रश्न  विचारला गेला तर अगदी गडबडून जाऊ नका. शांतपणे विचार करून उत्तरे द्या. जर तुम्हाला उत्तर माहिती नसेल तर तसे नम्रपणे सांगा.

इंटरव्यूमध्ये विचारले जाणारे संभाव्य प्रश्न

  • तुमच्याबद्दल काही सांगा

यांत तुमचा परिचय थोडक्यात करून द्या. तुमचे शिक्षण, उद्दिष्ट आणि तुमचे भविष्यातील प्लान्स या बदल बोला.

  • तुमची कौशल्ये सांगा

तुमच्या कौशल्याबद्दल माहिती देताना मुद्देसूद पद्धतीने द्यायचा प्रयत्न करा. क्रमाने सगळे मुद्दे विषद करा.

  • तुम्हाला स्वतःला पाच वर्षांनी कोठे पाहायला आवडेल

हा एक असा प्रश्न आहे जो सामान्यपणे सगळीकडे विचारला जाती. याचे उत्तर विचार करून आणि आकर्षक पद्धतीने द्या जेणेकरून तुमचा प्रभाव नक्की पडेल. तुमचे ध्येय काय आहे, आणि ते साध्य करणेसाठी तुमचे प्रयत्न कोण त्या दिशेने चालू आहेत हे स्पष्ट करा. तुम्ही तुमच्या करीयरच्या वाढीसाठी काय करत आहात आणि त्यातून कंपनीला फायदा कसा होणार आहे हे नक्की स्पष्ट करा.

मुलाखतीत हे आणि असे अनेक प्रश्न विचारले जातात. प्रश्न कोणताही असला तरी त्याचे मुद्देसद आणि समर्पक उत्तर दिलेत तर नक्की तुमचा प्रभाव  पडून तुमची  निवड होऊ शकते.

डिलिवरी एक्झेक्यूटीव म्हणून नोकरी मिळाल्यावर काय कराल?

ह्या क्षेत्रात नोकरी मिळाली की तुम्हाला  तुमच्या सगळ्या कौशल्यांचा वापर करून काम  करायचे आहे. नोकरी मिळाल्यावर  वेळ पाळणे खूप आवश्यक आहे . यांत तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तुमच्या विभागाची माहिती नेहमी तयार ठेवा