टेलिमार्केटींगच्या जॉबमध्ये कसे यश मिळवाल ?

हल्ली टेलिमार्केटींग या क्षेत्रात बरीच वाढ आणि प्रगती होत आहे. कंपनी लहान असो की मोठी, टेलिमार्केटींग हा मार्केटींगमधील एक महत्वाचा आणि अटळ मुद्दा ठरत आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही त्या पाळल्या तर तुमचा फायदा नक्कीच होईल.

इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना घाबरून जाऊ नका

बोलताना जर समोरच्या व्यक्तीकडून नकारात्मक प्रतिक्रिया आल्या तर घाबरून जाऊ नका. तसे होणे हे सहाजिकच आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे नेहमी लक्षात ठेवा. इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियांसाठी स्वतःला दोषी ठरवू नका. जर कामाच्या गडबडीत कोणी चुकीच्या शब्दात बोलत असेल तर त्याचे वाईट वाटून घेऊ नका. जर कोणी उद्धट उत्तरे देत असेल तर त्याचा परीणाम स्वतःवर करून घेऊ नका. अशी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळायला शिका. अगदीच जर त्रासदायक होत असेल तर धन्यवाद म्हणून संवाद थांबवणे इष्ट राहील. जर समोरच्या व्यक्तीने नकारात्मक प्रतिक्रिया दिलीच तर तुम्ही हसून विषयाला बगल नक्कीच देऊ शकता.

तुम्हाला काय हवे आहे ते स्पष्ट करा

बोलताना मोकळेपणे न लाजता बोला आणि तुम्हाला काय हवे ते स्पष्टपणे बोला, उदाहरणार्थ. Appointment, डेमो वगैरे. यासाठीच तुम्ही फोन केला आहे म्हणून न घाबरता नीट सांगा. समोरच्या व्यक्तीला तुमचे म्हणणे थोडक्यात पण समजेल अशा पद्धतीने समजावून सांगा. तुमचे बोलणे आकर्षक असेल तर समोरचा माणूस फोन न ठेवता तुमचे म्हणणे नक्की पूर्णपणे ऐकून घेईल.

अनुभवी लोकांचा सल्ला घ्या

अनुभवी लोकांकडून तुम्हाला बरेच काही शिकायला मिळेल. जर ते चांगले असतील तर नक्की काही चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवतील. जितका जास्त अनुभव तितके चांगले आणि आवश्यक सल्ले तुम्हाला नक्की मिळतील. तुमच्यापेक्षा वरिष्ठ लोकांना तुमच्या शंका विचारा. त्यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल.

प्रश्न विचारा

प्रश्न विचारून समोरच्याच्या शंका दूर करा, त्यांना बोलते करा.बोलताना आत्मविश्वास असू द्या. बोलताना समोरच्या व्यक्तीला योग्य ते प्रश्न विचारलेत तर तुमचे काम सोपे होईल आणि त्यांनाही तुमच्याशी बोलण्यात रस वाटेल. नाहीतर संवाद फार कंटाळवाणा होईल. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून तुमचा विषय त्यांना नीटपणे समजावून सांगणे सोपे जाईल.

बोलताना तुमच्यात आत्मविश्वास असू द्या

बोलताना तुमच्यात आत्मविश्वास असू द्या जेणेकरून समोरच्याला तुमचे बोलणे पटू शकेल. बोलताना नेहमी प्रामाणिकपणे बोला. समोरच्याने प्रश्न विचारल्यास आत्मविश्वासाने उत्तरे द्या. माहिती नसल्यास नम्रपणे तसे सांगा.

संयम बाळगा

या क्षेत्रात काम करणार्यांना खूप संयम ठेवणे आवश्यक आहे. या गोष्टीत वेळ लागतो आणि तितका संयम तुमच्यात असणे आवश्यक आहे. बोलताना नेहमी संयम बाळगा. समोरच्या व्यक्तीचे प्रश्न आणि बोलणे कायम नीट शांतपणे समजून घ्या आणि मग योग्य ती उत्तरे संयमाने द्या.

फॉलोअप

फॉलोअप ही या क्षेत्रातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. फक्त फोन करून माहिती देणे इतकेच नाही तर फॉलोअप ठेवणे तितकेच आवश्यक आहे.  तुमच्याकडे फोनवर बोलताना एक पेन आणि कागद समोर असू द्या, महत्वाच्या नोट्स लिहिण्यासाठी त्याचा उपयोग होईल. जर समोरची व्यक्ती फोनवर उपलब्ध नसेल तर वोईस कॉलचा वापर करून त्यांच्यासाठी मेसेज ठेवू शकता.

नीट ऐका

या क्षेत्रात जसे तुमचे संवादकौशल्य महत्वाचे आहे तसेच समोरच्या व्यक्तींनी बोललेले नीट ऐकून घेणे महत्वाचे आहे. ते काय बोलतात हे लक्ष देऊन ऐकलेत तर तुम्हाला योग्य ते उत्तर देता येईल. बोलताना प्रोफेशनल पद्धतीने बोला तसेच तुमचा स्वर सकारात्मक असू द्या.

डेटा

तुमचा डेटा नीट तपासून पहा. फोनवर बोलण्याआधी तुमचा डेटा किती अद्ययावत आहे हे तपासून पहाणे आवश्यक आहे. समोरचा माणूस काय प्रश्न विचारेल याची तयारी आधीच करून ठेवा. तुमच्या प्रोडक्टची माहिती आधी संपूर्ण तुम्हाला असली पाहिजे, ती करून घ्या. बोलताना महत्वाच्या नोंदी करा. तुमचा स्वतःचा  योग्य तो डेटा तयार करा.

रेकोर्डिंग

तुमच्या कॉल्सचे रेकोर्डिंग करून ठेवा ज्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे काय सुधारणा करता येतील हे तुमचे तुम्हाला समजेल.जर लोकांशी बोलताना काही चुका झाल्या असे तुम्हाला वाटत असेल तर पुढच्या वेळी त्याची दुरुस्ती करा.

तुमचे टार्गेट तुम्ही ठरवा

तुमच्या कॉल्सचे टार्गेट तुम्हीच ठरवा. दिवसाला किती कॉल्स करायचे आहेत त्यात्तून आउटपुट किती हे सगळे तुम्ही ठरवून घ्या. जर कॉल्स कमी पडत असतील तर त्यांची संख्या नक्की वाढवा. जितके जास्त कॉल्स कराल तितक्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत आहात.

उत्तम सिआरेम सिस्टीम वापरा

जर कॉल्स करण्यासाठी तुम्ही उत्तम सिस्टीम वापरलीत तर तुम्हाला या माहितीचा शोध घेता येईल. तुमच्याकडे योग्य सिस्टीम आहे की नाही याचा विचार करा. जर तुम्ही योग्य प्रणाली वापरून जास्तीत जास्त  ग्राहकांपर्यंत पोहोचू शकलात तर नक्कीच तुमचा त्यात फायदा आहे. तुमची सिस्टीम योग्य असेल तर तुमचे काम सोपे आणि लवकर होईल.

कॉल्सवर बोलताना सोपी भाषा वापरा

कॉल्सवर बोलताना साधी, नैसर्गिक भाषा वापरा. उगाच क्लिष्ट पद्धत वापरू नये. जर क्लिष्ट पद्धत वापरलीत तर ऐकणार्याला त्यात स्वारस्य वाटणार नाही. सोप्या भाषेत तुमचा मुद्दा समजावून सांगा म्हणजे समोरच्या माणसाला बोलावे वाटेल.

तुमचे ग्राहक ओळखा

तुमच्या ग्राहकांना नीट ओळखा. त्यांची पूर्ण माहिती करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्यांच्याशी बोलणे सोपे जाईल. फोन करण्याआधी ही सगळी माहिती करून घेणे आवश्यक आहे. बोलण्याचा सराव नक्की करा. ग्राहकांची यादी योग्य त्या ठिकाणहून मिळवा.

योग्य पद्धतीने मार्केट रिसर्च करा

तुम्ही जर मार्केट आणि ग्राहक यांचे नीट संशोधन केलेत तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतील. मार्केट मध्ये कोण्या नवीन पद्धती आहेत अजून काय नवीन आहे याचा अभ्यास केलात तर तुमचा फायदा नक्कीच होईल. यातुल नवनवीन कल्पना तुम्हाला सुचत जातील.

योग्य नियोजन करा

योग्य नियोजन करा म्हणजे तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. योग्य ती तयारी आणि नियोजन केलेत तर नक्की तुम्हाला फायदा होईल. ज्यांना कॉल करायचे असतील त्यांची यादी मिळवून तयारी करा म्हणजेच तुमची घाई होणार नाही. वेळेचे  योग्य नियोजन केलेत तर तुमचा वेळ फुकट जाणार नाही.

आवशयक प्रशिक्षण घ्या

आवश्यकता असल्यास योग्य ते प्रशिक्षण घ्या म्हणजे तुम्हाला तुमचे काम जास्त चांगल्या प्रकारे पार पाडता येईल. यासाठी विविध कोर्सेस असतात ज्यांचा फायदा तुम्ही घेऊ शकता. या कोर्सेसमध्ये तज्ञांकडून तुम्हाला चांगली आणि उपयोगी माहिती मिळविता येईल.

आकड्यांचे गणित मांडा

तुमचे ग्राहक तुमच्याकडे आपणहून येणार नाहीत. तुम्हाला त्यांच्याकडे जायचे आहे हे लक्षात असू द्या. तुम्ही जेवढे जास्त कॉल्स कराल तितके ग्राहक तुम्हाला मिळतील म्हणून तुम्ही किती कॉल दिवसाला करता याच्या गणिताकडे लक्ष असू द्या. भविष्यात हे कॉल्स किती वाढवायची गरज आहे, रोज किती कॉल्स करायला हवेत याचे गणित सतत मांडत राहा म्हणजे तुमचा फायदा होईल.सर्वसाधारणपणे एका सात तासाच्या दिवसात १०० किंवा त्याहून जास्त कॉल्स होणे अपेक्षित आहे. याबद्दल तज्ञ लोकांचा सल्ला नेहमीच तुम्हाला उपयोगी ठरेल.

आक्षेप हाताळायला शिका

तुमच्या मार्गात अनेक अडथळे येतील ज्यांचा सामना करायला शिका. त्यांचा अभ्यास करून ते कशाप्रकारे टाळता किंवा पार पाडता येतील याचा योग्य तो अभ्यास जरूर करा. नेहमीच तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणींसाठी स्वतःच्या मनाची तयारी केलीत तर तुमचा फायदा आहे.

जर तुम्ही टेलीमार्केटींग करताना काही योग्य टिप्सचा वापर केलात तर पूर्ण यशस्वी होऊ शकाल. तुम्ही जर योग्य पद्धतीने टेलीमार्केटींग केलेत तर फायदा नक्कीच आहे.