फ्री जॉब पोस्टिंग फीचर्स, का करायचा यांचा वापर

फ्री जॉब पोस्टिंग फीचर्स, का करायचा यांचा वापर
Tejashree
Mon, 09/23/2019 – 07:20

फ्री जॉब पोस्टिंग फीचर्स, का करायचा यांचा वापर

अनेक कंपन्या फ्री जॉब पोस्टिंग करतात कारण ते खूप फायद्याचे ठरू शकते. चला पाहूया काय आहेत ते फायदे. 

तुम्हाला पात्र उमेदवार मिळतील

 

फ्री जॉब साईट्सद्वारे तुम्हाला उत्तम आणि शिकलेले उमेदवार मिळू शकतील. तुम्हाला आलेल्या अर्जांतून तुम्ही योग्य वाटणाऱ्या उमेदवाराची निवड करू शकता. जर तुम्ही एटीएस सॉफ्टवेअरचा वापर केलात तर तुम्हाला फिल्टर करणे व त्यातून योग्य ते उमेदवार निवडणे सोपे जाईल. योग्य अशा उमेदवारांना तुम्ही बोलावू शकता. निवड न झालेल्या उमेदवारांनाही तुम्ही इमेलद्वारे तसे कळवू शकता. 

वेळेची बचत

तुमचे रोजचे काम सांभाळून लोकांपर्यंत पोहोचणे, उमेदवारांची निवड करणे हे वेळखाऊ काम आहे. फ्री जॉब साईट्स वर कमी वेळात तुम्हाला योग्य अशा उमेदवारांची माहिती मिळणे शक्य असते. 

तुमचा उत्तम डेटाबेस तयार होण्यास मदत होते. 

या साईट्समुळे उत्तम डेटाबेस तयार होण्यास मदत होते. जितके जास्त उमेदवार असतील तितकी निवड प्रक्रिया किचकट असू शकते. उत्तम असा डेटाबेस कमी वेळात आणि कौशल्याने तुम्ही तयार करू शकता ज्याद्वारे तुम्ही उमेदवारांची निवड करू शकता.

पोहोच 

तुम्ही या साईटद्वारे जास्तीती जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचू शकता. बरेच लोक या साईट्सचा वापर करतात आणि म्हणून अशा साईट्सचा फार फायदा होतो. 

उमेदवारांना मार्गदर्शन करा 

तुमच्याकडे आलेल्या उमेदवारांना योग्य ते मार्गदर्शन करा जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांच्याशी संवाद साधा जेणेकरून त्यांना नोकरी मिळविणे आणि उत्तम कामगिरी दाखवणे सोपे जाईल. त्यांना नोकरी शोधताना कोणत्या मुद्यांचा विचार करायचा ह्याची माहिती करून द्या. त्यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे

फायदे 
तुम्हाला मिळणारा पगार हा तुमच्या पॅकेजचा फक्त एक भाग असून त्याव्यतिरिक्त अनेक फायदे तुम्हाला आहेत जसे कि निरनिराळे अल्वंस,न वापरलेल्या सुट्ट्यांचे मिळणारे पैसे, विमा, बोनस वगैरे. या सगळ्याचा विचार जरूर करावा. बरेचदा कंपनी एखाद्या सहलीसाठी पैसे देते किंवा आणखी काही गोष्टी देते त्यांची विचारणा जरूर करावी. 

कामाचे तास
हल्लीच्या स्पर्धेच्या युगात हा कळीचा मुद्दा आहे. हल्ली कामाचे तास खूप जास्त असतात. कामाचे तास जास्त असल्यास तुमचा पगार त्या प्रमाणत आहे न याचा विचार नक्की करा.  जर कामाच्या काही विशिष्ट शिफ्ट असतील तर त्यांचा तुमच्या जीवनशैलीवर काय परीणाम होईल याचा विचार जरूर करा. जर कामाचे तास जास्त असतील तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परीणाम होईल. 

संस्कृती

तुमच्या ऑफिसचे वातावरण आणि संस्कृती हे तुमच्या नोकरीच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. जर ऑफिसमध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम होत असतील किंवा तसे वातावरण असेल तर नक्की तुम्हाला आनंद मिळेल. जर वातावरण खेळीमेळीचे असेल तर काम करताना नक्कीच समाधान मिळेल. जर उत्तम टीमवर्क असेल तर काम करण्यात एक निराळीच मजा येईल. काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची योग्य ती दाखल घेतली गेली तर काम करणार्यांना आणखी हुरूप येईल.

टीम

उत्तम टीमवर्क असेल तर कामही चांगले होईल आणि समाधानही मिळेल. जर काम करणारे एकमेकांना उत्तम सहकार्य आणि प्रोत्साहन देत असतील तर काम खूप चांगले होईल. जर तुम्ही मुलाखतीच्या वेळी टीम मधील काही लोकांना भेटला त्यांच्याशी बोललात तर या गोष्टींचा अंदाज तुम्हाला येईल. तुम्हाला जे मेल येतात त्यातील भाषेतूनही तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येऊ शकतो. तुमच्या वरिष्ठांशी मुलाखतीत बोलताना त्यांच्या स्वभावाचा, वागण्या बोलण्याचा अंदाज घ्या. जर त्यांचे वागणे बोलणे खेळीमेळीचे असेल तर तुम्ही नक्कीच त्या कंपनीची निवड करू शकता. जर तुमचे वरिष्ठ तुम्हाला सहकार्य देत असतील काम करताना नक्कीच तुम्हाला उत्साह वाटेल आणि तुम्ही यशस्वीरीत्या तुमचे कार्य करू शकता.

वाढीची संधी

या नोकरीत तुमची किती वाढ होणार आहे हे महत्वाचे आहे. जर वाढ आणि विकास होणार असेल तर नोकरी करण्यात मजा येईल आणि भविष्यासाठीही ते चांगले असेल. जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाता तेव्हा याबाबत प्रश्न जरूर विचारा. काम करताना तुम्हाला जे शिकायला मिळते व त्यातून तुमची जी प्रगती होते ते खूप महत्वाचे आहे आणि म्हणूनच या गोष्टींचा विचार नोकरीची निवड करताना जरूर करा. जर मुलाखतीच्या वेळी मोकळेपणे तुम्ही या गोष्टीची चर्चा केलीत तर तुमचा प्रभाव नक्कीच चांगला पडेल. त्या कंपनीची सोशल मिडिया पेजेस पाहूनही या गोष्टींचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. 

बढती

एकच पदावर नोकरी करण्यात काही मजा नाही. नोकरीला लागल्यानंतर काही कळत तुम्हाला बढती मिळणे आवश्यक आहे. नवीन कंपनीमध्ये नोकरीला जाताना या गोष्टीचा विचार जरूर करा की पुढे बढतीची संधी किती असेल.

ठिकाण

नोकरीचे ठिकाण तुमच्या घरापसुन किती जवळ आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. जर नोकरीचे ठिकाण फारच लांब असेल तर तुमचा येण्याजाण्यात खूप वेळ आणि पैसा खरच होईल. हेच जर ठिकाण जवळ असेल तर नक्कीच तुमचा वेळ वाचेल जो तुम्ही इतर ठिकाणी सत्कारणी लावू शकता. 

ख्याती

ज्या कंपनीत तुम्हाल नोकरी करायची आहे त्याची ख्याती कशी आहे हे विचारात घेणे गरजेचे आहे. जर कंपनीचे नाव चांगले असे तर तुम्हालाही अभिमानाने सांगता येईल तसेच जर तुम्ही तिथून दुसरीकडे नोकरी शोधायचा प्रयत्न केलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जर कंपनी नावाजलेली असे तर काम करताना वेगळाच आनंद मिळेल. 

कामाचे स्वरूप

 
तुमच्या कामाचे काय स्वरूप असेल हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जर काम कंटाळवाणे असेल तर नोकरी पण कंटाळवाणी होईल. जर कामात शिकण्यसारखे बरेच काही असेल तर त्या आनंद मिळेल. कामातून जर समाधान मिळाले तर तुमच्या नोकरीचे चीज होईल. 

नोकरी शोधताना अनेक बाबीचा विचार करावा लागतो. योग्य त्या बाबींचा विचार केलात तर नक्कीच तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. 

Language