बॅकग्राऊंड चेक कंपनी काय असतात ? आणि त्यांची गरज का असते ?

नावाप्रमाणेच, बॅकग्राऊंड चेक कंपनी या एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासण्यासाठी असतात. ह्या कंपन्या त्या उमेदवाराची सगळी माहिती शोधून काढतात  जसे की त्याची शैक्षणिक पात्रता, रेफरन्स, जुन्या कंपनीतील त्याचा रेकॉर्ड, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याचा पत्ता आणि इतर माहिती वगैरे अनेक महत्वाच्या बाबी या चेकमध्ये समाविष्ट होतात. हल्ली बरेचदा असे होते की फक्त नोकरी मिळविण्यासाठी उमेदवार चुकीची माहिती देतात. आणि अशा वेळी जर त्यांची निवड झाली तर पुढे काम करताना काही अडचणी उद्भवू शकतात. म्हणून योग्य वेळी असा चेक होणे आवश्यक आहे. काही मोठ्या कंपन्या अशा सेवा बाहेरून घेतात तर काही लहान कंपन्या त्यांच्या एचआर मधील लोकांची मदत यासाठी घेतात. अशा प्रकारच्या बॅकग्राऊंड चेक सेवा खूप फायदेशीर ठरतात.

ह्या चेकची आवश्यकता का आहे ?

असे लक्षात येते कि अनेक वेळा जे लोक नोकरीचा अर्ज करतात तेव्हा त्यांच्या बायो डेटा मध्ये बरीचशी माहिती चुकीची आणि खोटी असते. केवळ नोकरी मिळविण्यासाठी लोक पगाराचा आकडा वाढवून लिहितात किंवा काही पदव्यांचा उल्लेख करतात. अशा वेळी अशा चेकची गरज भासते. आजकाल सगळ्या कंपन्यांमध्ये असा चेक केला जातो. बरेचदा लोक केवळ  नोकरी मिळविण्यासाठी खोटी माहिती देतात आणि म्हणून अशा प्रकारच्या चेकची गरज असते. फक्त कंपन्या नाही तर बॅंका सुद्धा असा चेक करतात जेणेकरून ती व्यक्ती नक्की त्या ठीकाणी राहाते की नाही ते कळते. अनेक कंपन्या अशा प्रकारचा चेक  इतर बॅकग्राऊंड चेक सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांकडून करून घेतात. येथे आम्ही काही अशा प्रसिद्ध कंपन्यांची नावे दिली आहेत. ती वाचून तुम्हाला बरीच माहिती मिळू शकेल.

केपीएमजी

ही कंपनी खूप प्रसिद्ध कंपनी असून उच्च दर्जाची चेक सेवा रास्त दरात पुरविते. ही सेवा फक्त देशांत नाही तर परदेशातही उपलब्ध आहे. ह्या कंपनीत अनेक चांगली  माणसे आहेत जी हे काम चोख बजावतात. वेगवेगळ्या पद्धतीने येथे असा चेक केला जातो तसेच ब्लॉकचेनवर आधारित बॅकग्राऊंड चेक सेवा हे यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

ओनिक्रा

ही कंपनी फक्त बॅकग्राऊंड चेक करत नाही तर रेटिंगसेवाही पुरविते. तसेच अनेक इतर संबंधित सेवासुद्धा ही कंपनी पुरविते. ही कंपनी खूप नावाजलेली असून  त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे चेक केले जातात.

ओथ ब्रिज

ह्या कंपनीची स्थापना २००५ साली झाली.  ही कंपनी जवळपास १४० देशांमध्ये असा चेक करते. त्यांनी स्वतःची अशी चेक यंत्रणा शोधून काढली असून त्यानुसार कंपनी काम करते.

आयडी एफ वाय

ही कंपनी मुंबईची असून ही कंपनी अशा प्रकारची चेक सुविधा पुरविण्यासाठी प्रसिद्ध आहे. फक्त नोकरी संदर्भातच नव्हे तर मृत्यू संबंधी कागदपत्र, सोशल मिडिया चेक असे अनेक चेक ही कंपनी करते. ही कंपनी  स्वतःची अशी अद्ययावत चेक यंत्रणा वापरून काम करते.

वेरिफेक्ट

ही कंपनी बंगलोर येथे स्थित असून ही देशातील सगळ्यात उत्तम चेक कंपन्यांपैकी एक असून ही कंपनी अशी चेक सेवा देशभरात ६०० हून जास्त कंपन्यांना पुरविते.

फर्स्टकॉर्प

हि नावाजलेली कंपनी  ओहिओ येथे स्थित असून याची यंत्रणा बंगलोर येथे आहे. ह्या कंपनीच्या टीममध्ये उत्तम लोकांचा समावेश असून हे उच्च दर्जाच्या चेक सेवा जगभरात पुरवितात. त्यांच्याकडे अद्ययावत असा डेटा बेस असून त्यामुळे काम करणे त्यांना सोपे जाते.

फर्स्ट एडवांटेज

ही कंपनी खूप मोठी आणि प्रतिष्ठित कंपनी असून ही कंपनी एकूण १४ देशांतील २५००० हून जास्त कंपन्यांमध्ये हि सेवा पुरीविते.

www.mintly.in

ही एक अशी साईट आहे जी उच्च दर्जाच्या बॅकग्राऊंड चेक सेवा योग्य दरात प्रदान करते. तुम्हाला जर या सेवा हव्या असतील तर नक्की तुम्ही संपर्क करू शकता. मिन्टली बॅकग्राऊंड चेक नक्क्कीच तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

बॅकग्राऊंड चेक इतिहास आणि पार्श्वभूमी

अशा पद्धतीच्या चेकची सिस्टीम खूप जुनी असून अनेक परदेशी कंपन्यांमध्ये याचा वापर जुन्या काळातही केला जात असे. काही  विवध ठिकाणहून नोकरी शोधणारे उमेदवार एका  केंद्रांवर भेटले आणि ही  संकल्पना उदयास आली. अशा अनेक लहान तसेच मोठ्या कंपन्या  आताच्या काळात निघाल्या आहेत  इतकेच नाही तर हा चेक ही काळाची गरज बनली आहे.

किंमत

प्रत्येक उमेदवाराच्या चेकचा खर्च साधारणपणे २५०० ते १०००० इतका येतो आणि बरेचदा ते त्या कंपनीवर  किंवा उमेद्वारावरही अवलंबून असते. कोणत्या प्रकारचे चेक आणि ते कोणत्या कारणासाठी केले आहेत यावरही याची किंमत ठरते. जितके जास्त चेक करायचे असतील तितके जास्त पैसे वाढतात. याचे कारण असे कि अशी पडताळणी करण्यासाठी या कंपन्यांना अनेक इतर लोकांना पैसे द्यावे लागतात. जसे कि त्यांना शैक्षणिक पात्रता तपासून घेण्यासाठी कॉलेज मध्ये चेक करावा लागतो, किंवा पगारच्या आकड्यासाठी जुन्या कंपनीत  संपर्क करावा लागतो. काही वेळा काही ठीकाणी प्रायवेट व्यक्ती नेमणे गरजेचे होते  आणि म्हणून त्यासाठी जास्त खर्च येतो.

ह्या प्रक्रियेला किती वेळ लागतो

ह्या प्रक्रियेला साधारणपणे तीन दिवस ते दहा दिवस इतका वेळ लागू शकतो. यांत प्रमाणपत्रे, पगारची स्लीप अशी कागदपत्रे समाविष्ट असतात. जितकी जास्त कागपत्रे असतील तितका जास्त वेळ या प्रक्रियेला लागतो.

कोणते घटक शोधले जातात

  • कोणत्याही कारणाने झालेला ब्रेक
  • शैक्षणिक पात्रता
  • शेवटच्या पगाराचा नक्की आकडा
  • पदव्या आणि प्रमाणपत्रे

अशा प्रकारच्या चेकमध्ये कशाचा समावेश असतो

रेकॉर्ड

एखाद्या उमेद्वारची संपूर्ण पार्श्वभूमी  तपासली जाते.

कामाचा इतिहास

आधीच्या कंपनीत त्याने काय काम केले आहे  आणि कामाचे स्वरूप काय होते हे तपासले जाते. ती व्यक्ती त्या ठीकाणी नक्की  किती काळासाठी कामाला होती आणि काम कसे करत होती हे तपासले जाते.

बॅकग्राऊंड चेक  आणि सोशल मिडिया

आजकाल सगळ्या कंपन्या  सोशल मिडीयावर असतात आणि इथून  एखाद्या माणसाची पार्श्वभूमी  तपासणे सोपे जाते. एखादी  व्यक्ती सोशल मिडीयावर  कोणत्या प्रकारच्या पोस्ट  टाकते किंवा कोणत्या प्रकारचे फोटो टाकते यावरून चेक करणे सोप जाते.एखादी व्यक्ती, तिच्या आवडी निवडी, तिने जोडलेले समूह तसेच तिचे मित्रमंडळ कसे आहे या गोष्टी येथून तपासणे अगदी सोपे जाते. अशा प्रकारचा चेक हे एक प्रभावी साधन आहे.  जगभरात वेगवेगळ्या देशांत अशा प्रकारचा चेक  केला जातो.

अशा प्रकारचे चेक करताना कोणते नियम पाळले जातात

अशा प्रकारचा चेक करताना काही नियम पाळावे लागतात

गोपनीयता ठेवणे अनिवार्य आहे

अशा र्पकारचा चेक करताना गोपनीयत ठेवणे खूप आवश्यक आहे. तसेच ही माहिती कुठेही पसरली जाऊ नये याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. कोणालाही न समजता किंवा त्रास होता असा चेक केला गेला पाहिजे. ह्यासाठी सगळ्यात आधी उमेदवाराची परवानगी घेणे अनिवार्य आहे. जर उमेदवाराची इच्छा नसेल तर असा चेक केला जाऊ नये. मोठ्या कंपन्या अशी कामे करायला बाहेरील एजन्सीकडून सेवा घेतात तर काही लहान कंपनीतील एच आर मधील  व्यक्ती ही कामे करतात. असा चेक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्या अवलंबल्या जातात.

बॅकग्राऊंड चेक प्रत्येक कंपनीसाठी आवशयक प्रक्रिया आहे जी योग्य पद्धतीने केली गेली पाहिजे.

यांत आधी उमेदवाराचे संपूर्ण नाव नीट तपासले जाते. नावाचे स्पेलिंग त्याच्या प्रमाणपत्राच्या स्पेलिंगशी जुळते की नाही याची खात्री केली जाते. जुन्या कंपनीत संपर्क करून त्याची पूर्ण माहिती शोधून  काढली जाते तसेच जिथून पदव्या मिळविल्या तिकडे तपासणी केली जाते.  यासाठी परवानगी घेणे खूप आवश्यक आहे. जर आधार कार्ड क्रमांक वगैरे क्रमांक चुकीचा असेल तर त्या त्या उमेदवाराशी संपर्क साधला पाहिजे.