भारतातील एच आर धोरणे

एच आर मधील धोरणे ठरविताना आणि प्रस्थापित करताना, परदेशी कंपन्यांनी स्वतःच्या पद्धती आणि देशातील स्थानिक नॉर्म्स यांच्यात समतोल साधणे आवश्यक आहे. परदेशी कंपन्यांनी देशातील कायदे तसेच नियम यांचाही अभ्यास केला पाहिजे.जर तुमच्या कंपनीत चांगली एच आर धोरणे असतील तर कर्मचारी टिकून राहातील आणि नवीन कर्मचारीही तुमच्या कंपनीकडे नक्कीच आकर्षित होतील. जर तुमची धोरणे योग्य असतील तर तुमच्या कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेत नक्कीच वाढ होईल. आज आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमच्यासाठी फायदेशीर असतील. हो धोरणे जर तुम्ही अवलंबलीत तर नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो.

करार

जर तुम्ही कर्मचार्यांबरोबर एक लिखित करार केलात, ज्यात सर्व नियम आणि अति यांचा समावेश असेल तर त्याचा नक्की फायदा होईल. याने धोरणे आणि नियम अधिक स्पष्ट होतील आणि कर्मचाऱ्यांना काम अकरणे अधिक सोपे आणि सोयीचे होईल. भारतात निरनिराळे कायदे हे कर्मचारी आणि नोकरी यांना लागू होतात आणि त्यांची नोंद असल्यास सोयीचे आणि सोपे होईल. कर्मचार्याला नियुक्त करताना त्यांच्याशी योग्य करार लिखित स्वरुपात करणे आवशयक आहे.

पगार

कर्मचार्यांना मिळणारा पगार हा जर आकर्षक असेल तर नक्कीच ते टिकून राहातील. पगारात जर नियमित वाढ केली गेली तर कर्मचार्यांना काम करण्यात नक्कीच हुरूप येईल. वेतन ठरवताना ते नियमांना धरून आहे की नाही याची खातरजमा करणे आवश्यक आहे.पगार हा योग्य वेळी ठरलेल्या तारखेला देणे गरजेचे आहे, जर त्या दिवशी रविवार असेल तर तो पगार एक दिवस आधी दिला गेला पाहिजे.

रोजगाराची समाप्ती

जर तुम्हाला एखाद्या कर्मचार्याला कामावरून काढून टाकायचे असेल तर त्याला योग्य त्या वेळी तशी कल्पना देणे आवशयक आहे. बाहेर पडताना त्याला त्याच्या भरलेल्या दिवसांचा पगार आणि बोनस तसेच इतर लागू गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत. जर एखाद्या कर्मचार्याला कामावरून काढायचे असेल तर त्याला त्याचे कारण दिले गेले पाहिजे. तसेच एक महिना आधी सूचना देणे  अत्यावश्यक आहे.

बाळंतपण रजा

ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर तुमच्या कंपनीमध्ये एखादी स्त्री कर्मचारी गरोदर असेल तर तिला सहा महिन्यांची भरपगारी रजा मंजूर केली गेली पाहिजे. जर एखाद्या पुरूष कर्मचार्याची पत्नी गरोदर असेल तर त्यालाही नियमाप्रमाणे पाच ते सात दिवस रजा मंजूर केली गेली पाहिजे. जर तुमच्या कंपनीतील कर्मचार्यांची संख्या ५० पेक्षा जास्त असेल तर पाळणाघराची सोय कामाच्या ठिकाणी केली गेली पाहिजे.

रजा

कर्मचार्यांना पुरेशा रजा नियमाप्रमाणे मिळाल्या पाहिजेत. आठवड्याची एक रजा तसेच काही निवडक रजा मिळाल्या पाहिजेत. कर्मचार्यांना वर्षाच्या सुरुवातीलाच कोणत्या रजा आहेत हे जाहीर केले पाहिजे.

प्रॉविडट फंड

प्रॉविडट फंड तसेच काही इतर संबंधित सुविधा कर्मचार्यांना पुरविल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना नोकरी सोडल्यानंतर फायदा होईल. नियमाप्रमाणे जितकी वर्षे नोकरी केली आहे त्याच्या प्रमाणात  प्रॉविडट फंड आणि लागू असल्यास पेन्शन दिले गेले पाहिजे.

डिजिटलायझेशन

हल्ली तंत्रज्ञान विकासित आणि प्रगत झाले असून एच आर डिपार्टमेंटचा आवाका वाढला आहे आणि त्यात डिजिटल तंत्रज्ञान समाविष्ट झाले आहे. अने निरनिराळे apps लोक आपल्या मोबाईलवर वापरत असून या डिपार्टमेंटचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे, पसरत आहे. रिक्रुटमेंटसाठी निरनिराळ्या प्लेटफॉर्मचा वापर होतो आहे. जर कर्मचार्यांना अशा सोयी दिल्या गेल्या तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो/

बदलती कार्य संस्कृती

हल्ली भारतातील कामाची पद्धतीन आमूलाग्र बदलत असून त्यात अनेक नव्या गोष्टींचा समावेश होतो आहे.जुनी नऊ ते पाच पद्धती बदलत असून कामाचे तास आणि एकूण पद्धती ही प्रगत होते आहे. कंपन्या ह्या नवीन पद्धती अंगीकारत असून हळू हळू कार्य आणि जीवनाचा समतोल साधताना दिसतात.कामाचे तास कर्मचार्यांना सांगितले गेले पाहिजेत, तसेच ओवरटाइम इत्यादीबद्दल तपशीलही सांगितला गेला पाहिजे. कामावरचे वातावरण हे आनंदी आणि पोषक ठेवणे खूप महत्वाचे आहे.

तक्रार निवारण

जर कर्मचार्यांना कोणतीही तक्रार असेल तर त्याचे निवारण योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी केले गेले पाहिजे. तक्रारीची योग्य ती दाखल घेऊन योग्य पद्धतीने त्यावर कारवाई केली गेली पाहिजे.

बौद्धिक संपत्ती

कंपनीची बातमी ही गोपनीय राहण्याबाबत सगळी माहिती कर्मचार्यांना सांगितली गेली पाहिजे. कंपनीची मालमत्ता आणि जपणूक या बाबत कोणत्याही गोष्टींची माहिती गोपनीय ठेवायची आहे याची माहिती ही आधी दिली गेली पाहिजे.

 ही धोरणे कशासाठी केली गेली आहेत

एच आर च्या धोरणांची यादी यासाठी केली गेली असते की त्यामुळे काम करताना कर्मचार्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांच्यात कोणतेही वाड किंवा मतभेद उद्भवू नयेत. जर तुम्ही स्वतःच बनवलेली धोरणे पाळली नाहीत तर कोणताही कर्मचारी तुमच्या विरोधात तक्रार नोंदवू शकतो. या धोरणांमुळे काम करताना प्रशासनात शिस्त राहाते. यांमुळे सगळ्या कर्मचार्यांना समान वागणूक मिळेल आणि कोणावर अन्याय होणार नाही.

एच आर टीमची भूमिका

कर्मचारी आणि त्यांचे काम या बाबतीत एच आर टीम खूप महत्वपूर्ण भूमिका निभावते. ही टीम लोकांची नेमणूक करते तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते. हे प्रशिक्षण खूप महत्वाचे असते. ही टीम स्टाफच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा देते. सगळ्या कर्मचार्यांना समान वागणूक मिळते आहे याची खात्री करते.

वयोमर्यादा

कायदा असे सांगतो की १४ वर्षाखालील मुलांना कोणत्याही प्रकारे कामाला लावू नये. म्हणून याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे की तुमचे कर्मचारी हे १४ वर्षांखालील नाही.

बढती

कर्मचार्यांना वेळोवेळी बढती तसेच पगारवाढ देणे खूप आवश्यक आहे जेणेकरून त्यांना काम करायला हुरूप येईल. वेळोवेळी त्यांच्या कामगिरीप्रमाणे त्यांना पगारवाढ तसेच बढती देणे आवश्यक आहे. एच आर डिपार्टमेंटने सतत सर्व कर्मचार्यांची कामगिरी तपासणे आणि त्याचे अवलोकन करणे खूप आवश्यक आहे. जे कर्मचारी उत्तम कामगिरी निभावत असतील त्यांचे कौतुक करणे तसेच त्यांची बढती करणे गरजेचे आहे. जर एखादी व्यक्ती चांगली कामगिरी करत नसेल तर त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते.

कामाच्या ठिकाणची सुरक्षितता

प्रत्येक कर्मचार्याला एक सुरक्षित वातावरण कामाच्या ठिकाणे देणे हे एच आर टीमची मुख्य जबाबदारी आहे. त्यांना काम करताना काही भीती असेल तर त्याचे निराकरण एच आर टीमकडून केले गेले पाहिजे. कामाचे वातावरण पोषक तसेच निरोगी असायला हवे. कामाचे ठिकाण हे स्वच्छ तसेच योग्य असणे आवश्यक आहे.

इंडस्ट्रीयल डिस्प्युट एक्ट

इंडस्ट्रीयल डिस्प्युट एक्ट आणि अनेक विविव्ध संबंधित एक्टची अंमलबजावणी होणे फार महत्वाचे आहे. या एक्टमध्य कामाचे तास इथपासून ते कंपनी आणि सर्व कर्मचारी यांच्यात समतोल साधण्यापर्यंत सर्व गोष्टी या कायद्यात सामावल्या जातात. जर कर्मचाऱ्यांत आपसांत काही वाद असतील किंवा प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात कोणतेही तंटे असतील तर ते वेळेत सोडवले जाऊन त्यावर योग्य तो तोडगा काढला पाहिजे जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही. यांमुळे प्रशासनात खेळीमेळीचे वातावरण राहील आणि काम करताना सगळ्यांनाच उत्साह वाटेल.

जर तुमच्या कंपनीमधील एच आर धोरणे योग्य असतील तर तुमच्याकडे नवीन कर्मचारी तर आकर्षित होतीलच पण तुमचे असलेले कर्मचारी सोडून जाणार नाहीत तसेच ते आणखी चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन कर्मचार्याला नियुक्त करता तेव्हा त्यावेळी तुमच्या कंपनीचे नियम तसेच एच आर ची विशिष्ट धोरणे त्याला समजावून सांगणे आवशयक आहे. जर एखादे विशिष्ट धोरण बदलले तर त्याची माहिती सर्व कर्मचार्यांना देणे हेही सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. जर तुमची एच आर धोरणे योग्य असतील तर तुमचे कर्मचारी योग्य पद्धतीने काम करतील आणि तुमच्या कंपनीची प्रगतीही वेगाने होईल.