भारतातील वर्क फ्रॉम होम संधी

हल्लीच्या प्रगतीच्या काळात ऑफिसमध्ये जाऊन नऊ ते पाच काम करणे हे कामाचे स्वरूप बदलत असून फक्त बाहेर जाऊनच नव्हे तर घरात बसून केलेल्या कामाला तितकेच महत्व आहे. घरात बसून तुमच्या सोयीने तुम्ही भरपूर कमाई करू शकता. निरनिराळ्या प्रकारचे असे वर्क फ्रॉम होम उपलब्ध आहेत जे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे घरातून करू शकता आणि पैसे मिळवू शकता. आता पाहूया कोणत्या कोणत्या संधी वर्क फ्रॉम होम मध्ये उपलब्ध आहेत. आता पाहूया कोणत्या प्रकारच्या अशा संधी उपलब्ध आहेत ते.

कंटेंट रायटर

कंटेंट रायटिंग करून तुम्ही घरातून काम करू शकता. यासाठी कोणत्याही पदवीची किंवा प्रशिक्षणाची गरज नाही, भाषेवर तुमचे प्रभुत्व असले कि अनुभवातून शिकून तुम्ही हे काम उत्तम प्रकारे करू शकता. निरनिराळ्या साईट्सवर अशा प्रकारच्या संधी तुम्हाला मिळू शकतात. दिवसातून साधारणपणे चार ते सहा तास काम करून तुम्ही उत्तम मिळकत नक्कीच करू शकता. यासाठी पूर्ण वेळ काम करण्याची गरज नाही, तुम्ही पार्ट टाईम वर्क फ्रॉम होम जॉब्स करू शकता.

इ  क्लासेस

निरनिराळ्या प्रकारचे क्लासेस तुम्ही विडीयो कॉलिंग द्वारा घेऊ शकता. यांत अभ्यासाबरोबरच विविध कलांचा समावेश होतो. हे क्लासेस तुम्ही तुमच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोयीने ठरवून घेऊ शकता. यासाठी तुमच्याकडे स्काईप अकाऊंट असणे आवश्यक आहे किंवा विडीयो कॉलिंग द्वारा तुम्ही अशा प्रकारचे ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता. विविध कला जसे संगीत, हस्तकला, चित्रकला, नृत्य याचेही ऑनलाईन क्लासेस तुम्ही घेऊ शकता. यामुळे तुमचा येण्याजाण्याचा वेळ वाचतो आणि त्यासाठीचे पैसेही वाचतात.  

अनुवाद

अनेक कंपन्या अशा असतात ज्यांना अनुवाद करून पाहिजे असतो. त्यासाठी त्यांना पूर्ण वेळ अनुवादक ठेवणे शक्य होत नाही, अशा वेळी ते बाहेरून मदत घेतात. आणि म्हणूनच या क्षेत्रात फ्रीलान्स संधी बर्याच उपलब्ध आहेत.  ज्या भाषांवर तुमचे उत्तम प्रभुत्व आहे अशा भाषांत तुम्ही भाषांतर करून उत्तम प्रकारे पैसे मिळवू शकता.

वर्च्युअल असिस्टंट

या प्रकारच्या जॉबला भरपूर वाव आहे. हे असे सहाय्यक असतात जे घरातून इंटरनेटच्या सहाय्याने मदत करतात. इंटरनेटचा वापर करून ते बिजिनेस वाढवायला मदत करतात. हे लोक बरीचशी निरनिराळी कामे करतात जसे कि मेल्सना योग्य ती उत्तरे देणे, एक्सेल शीट बनवणे, अशी अनेक कामे त्यांच्या अखत्यारीत असतात. यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही, जर तुमच्याकडे उत्तम संवाद कौशल्ये असतील तर तुम्ही हे काम नक्की उत्तम प्रकारे करू शकता. तुम्हाला संगणकाचे उतम ज्ञान असले तर तुम्ही नक्की हे काम योग्य प्रकारे करू शकाल.

वेब डेवलपर 

या प्रकारच्या जॉब्सनासुद्धा खूप वाव आहे. यांत तुम्ही महिन्याला घरबसल्या १५००० ते २०००० मिळवू शकता. जर तुम्हाला वेब डेवलपमेंटच ज्ञान असेल तर नक्कीच तुम्ही हे काम करू शकाल.

सोशल मिडिया मॅनेजर

सोशल मिडिया मॅनेजमेंट या प्रकाराला हल्ली खूपच वाव आहे. प्रत्येक बिझिनेसचे सोशल मिडीयावर असणे आवशयक आहे आणि म्हणून हे मार्केटींग तितकेच महत्वाचे आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीचे सोशल अकाऊन्ट चालवायला तसेच सोशल मिडिया मॅनेज करायला मदत करू शकता. एखाद्या मोठ्या माणसाचे सोशल मिडिया अकाऊन्ट सांभाळणे, जाहीरात, ब्लॉग लिहिणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदार्या यात असतात. यासाठी तुम्हाला तांत्रिक ज्ञान असायला हवे.

वर्क फ्रॉम होमचे जॉब्स कसे शोधाल ?

ह्या प्रकारचे जॉब्स तुम्हाला निरनिराळ्या साईट्स वरून मिळू शकतात. Mintly.in सारख्या अनेक अशा साईट्स आहेत जिथे तुम्हाला या प्रकारची मदत मिळू शकते. अशा साईट्स वर तुम्ही तुमची नोंदणी करू शकता.

 नोकरी किंवा करीयरची व्याख्या बदलली असून फक्त ऑफिसला जाऊन काम करण्याइतकी  मर्यादीत नसून घरातूनही निरनिराळ्या प्रकारे काम करून तुम्ही तुमचे उत्तम करीयर घडवू शकता तसेच उत्तम मिळकत तुम्हाला मिळू शकते. घरातून काम करण्यालाही उत्तम प्रतिसाद आहे. उत्तम करीयर करा आणि चांगले पैसे मिळवा.