भारतातील २०२० सालातल्या सर्वोत्तम नोकरीच्या संधी

आपला देश हा वेगाने प्रगती करत आहे. उद्योगांच्या वाढीमुळे नोकर्यांची उपलब्धताही वाढली आहे. अनेक अशा नवीन संधी येत्या वर्षांत उपलब्ध होणार आहेत. विविध क्षेत्रात अशा संधी उपलब्ध होणार असून त्याचा फायदा नक्कीच करून घेता येईल. तर आता पाहूया कोणत्या क्षेत्रात आणि किती नवीन संधी उपलब्ध असणार आहेत ते.

 मास मिडिया

हे क्षेत्र बरीच प्रगती करत असून ववेगाने  यांत वाढ होताना  दिसते आहे. या क्षेत्रात नवीन वर्षांत अनेकविध नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून यांत तुम्हाला उत्तम जॉब्स नक्कीचमिळू शकतील. यांत जास्त पगारच्या नोकर्या उपलब्ध असतात. मिडीयाच्या वाढत्या ताकतीनेच, नवीन विद्यार्थी आणि उमेदवार  या क्षेत्राकडे आकर्षित होताना दिसतात.

शैक्षणिक पात्रता

या क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी मास मिडिया क्षेत्रातील पदवी तसेच संबंधित अनुभव हा महत्वाचा आहे.

बँकिंग

बँक हे क्षेत्र वेगाने विस्तारत असून नवनवीन बँका  आणि शाखा नव्याने उदयाला येत आहेत. त्याचबरोबर नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत असून यांत उत्तम पगाराच्या नोकर्या समाविष्ट आहेत. यासाठी बँकिंगची परीक्षा पास होणे अनिवार्य आहे. पेपरमध्येही जाहिराती सतत येत असतात जर त्या पाहून अर्ज केला तर एक उत्तम जॉब मिळण्याची शक्यता आहे. जर परीक्षा तुम्ही चांगल्या मार्काने पास झालात तर नक्की तुम्हाला नोकरी मिळू शकेल. ही नोकरी कायमस्वरूपी असेल. 

शिक्षण क्षेत्र

नवनवीन शैक्षणिक संस्था तसेच शाळा महाविद्यालये यांत नवनवीन संधी उपलब्ध आहेत. फक्त शिक्षक नव्हे तर समुपदेशक इत्यादी अनेक नवनवीन संधी उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला भारतातील उत्तम जॉब्स शोधता येतील.

यासाठी पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक असून या  क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल. हल्ली ऑनलाईन क्लासेसना सुद्धा भरपूर वाव आहे. तुमच्या सोयीनुसार ऑनलाईन शिक्षण डून तुम्ही उत्तम अर्थार्जन नक्कीच करू शकता.

डिजिटल मार्केटींग

हे क्षेत्र नव्याने विस्तारत असून यांत नवनवीन संधी उपलब्ध होताना दिसतात. यान अनेक विविध प्रकारच्या नोकर्या उपलब्ध आहेत जसे की आर्टिकल, ब्लोग, वगैरे. सध्याचे जॉब मार्केट पाहता या क्षेत्रात वाढ होते आहे आणि यांत मोठ्या पगाराच्या नोकर्या सहज उपलब्ध आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या वाढीबरोबरच या क्षेत्राचा विकास होत असून यांत नोकरी करणे फायद्याचे ठरेल.

शैक्षणिक पात्रता- या क्षेत्रात काम करायचे असल्यास या क्षेत्रातील पदवी किंवा पदविका तसेच तसा अनुभव असणे खूप गरजेचे आहे.

डेटा एनालीसिस

जरी संगणकामुळे सगळा बदल झालेला असला तरी डेटा एनालीसिसची गरज ही पडतेच. जरी डेटा आणि त्याची स्टोर करायची पद्धत बदलली असेल तरी त्याचा वापर करण्याची पद्धत तीच आहे.या क्षेत्रात खूप वाव असून डेटा एनालीसिस या क्षेत्रात युवा पिढी नव्याने पदार्पण करताना दिसते. या क्षेत्रात जास्त पगाराचे जॉब्स येत्या वर्षात भरपूर आढळतील.

डेवेलेपर

इंटरनेट हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा घटक झाला असून एखादी छानशी वेबसाईट तयार करण्यापासून ते एखाद्या ब्रांडचे प्रमोशन करेपर्यंत अनेक भूमिका एका डेवेलेपरला निभावाव्या लागतात. म्हणूनच मोठ्या कंपनीत डेवेलेपरच्या नोकरीसाठी खूप मागणी असते आणि या क्षेत्रात आता खूप वाव आहे.

सायबर सिक्युरिटी

इंटरनेटच्या वाढत्या वापराने सायबर सिक्युरिटी ची खूप गरज असून या क्षेत्रात अनेक जॉब्स उपलब्ध आहेत. ही काळाची गरज असून हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे.

तंत्रज्ञान लेखक

हे क्षेत्र मोठ्या झपाट्याने विस्तारत असून यांत अनेक संधी नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहेत. या क्षेत्रात उत्तम लेखकांना वाढती मागणी असून जर तुम्हाला उत्तम लिहिता येत असेल तर नक्कीच तुम्ही चांगली नोकरी मिळवू शकता.  यांत अनेक संधी उपलब्ध असून तुम्ही यांत उत्तम असे करियर घडवू शकता. यांत बरीच कामे करायची असतात जसे की  तांत्रिक दस्तऐवज तयार करणे वगैरे. निरनिराळ्या जॉब्स साईट्स वर अशा प्रकारच्या नोकर्या उपलब्ध आहेत. तुम्ही स्वतःच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार घरातून काम करूनही अर्थार्जन नक्कीच करू शकता.

फायनान्स एनालीस्ट

कंपनीत फायनान्स एनालीस्ट करणे हे खूप महत्वाचे काम असून या क्षेत्रात अनेक नवनवीन अशा संधी उपलब्ध आहेत.रोजच्या फायनान्सचा अभ्यास आणि संशोधन करणे आणि आर्थिक सल्ला देणे हे या भूमिकेचे मुख्य कार्य आहे. कंपनीची अर्थव्यवस्था सुधारणे आणि त्यास आवश्यक ती सगळी इतर कार्ये याच्या अखत्यारीत येतात. यास्तही या क्षेत्रात पदवी आणि अनुभाव असणे आवश्यक आहे.

सिविल सर्विसेस

ह्या क्षेत्रात येत्या वर्षांत अनेक नवीन संधी उपलब्ध होणार असून या क्षेत्राचा विचार करायला काहीच हरकत नाही. ह्या क्षेत्रात नोकरी करणार्यांना भरपूर पगार असतात आणि म्हणून ह्या क्षेत्रात येणे आणि नोकरी करणे खूप फायद्याचे ठरेल.

कंपनी सेक्रेटरी

कंपनी सेक्रेटरी हा कंपनीचा कायदेशीर सल्लागार असतो. कंपनीला कायदेशीर सल्ला देणे ही खूप आवश्यक बाब असल्याने या क्षेत्रात उमेदवारांना खूप वाव आहे. ह्या क्षेत्रात नोकरी हवी असल्यास कंपनी सेक्रेटरीची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. कंपनी सेक्रेटरी तसेच चार्टर्ड अकौंटट या दोन्ही देशातील सर्वाधिक पगाराच्या नोकर्या आहेत.

ब्लॉकचेन डेवलपर

सध्या ब्लॉकचेन ही संकल्पना खूप नव्याने उदयास येत असून या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध आहेत. यासाठी ब्लॉकचेन या विषयात ज्ञान असणे गरजेचे आहे.

शैक्षणिक पात्रता – यासाठी पदवी आणि ब्लॉकचेन मधील ज्ञान तसेच अनुभव असणे आवश्यक आहे.

उत्तम जॉब मिळवण्यासाठी पुढील वर्षात काय कराल

तुम्हाला तुमच्या पसंतीचा जॉब पुढच्या वर्षात मिळवायचा असेल तर तुम्हाला योग्य ती तयारी करायची आहे. तुम्ही निरनिराळ्या वेबसाईटवर अशी नोकरी नक्कीच शोधू शकता. त्या साईट्सवर या अशा प्रकारच्या नोकर्या आणि त्याचे तपशील म्हणजेच पात्रता वगैरे दिलेले असतील. त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला मुलाखतीची तयारीही पारणे आवश्यक आहे जेणेकरून तुमची नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल. निरनिराळ्या अशा एजन्सीमध्येही तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता जिथे नवी जॉब्स साठी मदत केली जाते. योग्य त्या पद्धतीने प्रयत्न केल्यास तुम्हाला येत्या वर्षात नक्कीच चांगली आणि तुमच्या आवडीची नोकरी मिळू शकेल.