मराठी वक्ता म्हणून नोकरीच्या संधी

मराठी वक्ता म्हणून नोकरीच्या संधी
Tejashree
Thu, 09/12/2019 – 12:08

मराठी वक्ता म्हणून नोकरीच्या संधी

हल्लीचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि अनेक  नोकरीच्या उत्तम संधी आज उपलब्ध आहेत. अनेक असे स्त्रोत आहेत जिथून तुम्हाला योग्य ती नोकरी मिळू शकते. ही नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य त्या साईटवर जायचे आहे. अशा अनेक साईट्स आहेत जिथे अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात जसे की नौकरी डॉट कॉम, मिंटली.इन वगैरे.  त्याचबरोबर तुम्हाला योग्य ती तयारी करायची आहे जेणेकरून ही संधी प्राप्त करून घेता येईल. जर तुम्ही योग्य ती तयारी केलीत तर तुम्हाला मनासारखी नोकरी नक्कीच मिळू शकेल.

अर्ज करा

हल्ली नोकरीच्या बर्याच संधी उपलब्ध आहेत ज्यांचा नक्कीच तुम्ही फायदा करून घेऊ शकता. विविध पदांसाठी या नोकर्या उपलब्ध आहेत जसे की प्राध्यापक, समुपदेशक, मराठी वक्ता वगैरे. यासाठीची पात्रता तुमच्याकडे असेल तर नक्कीच ही नोकरी तुम्ही मिळवू शकता. वृत्तपत्रात अशा प्रकारच्या रीक्त जागांची माहिती दिलेली असते, त्याचबरोबर त्यासाठी लागणारे शिक्षण, अनुभव ह्यांचीही माहिती दिलेली असते. रोज जर तुम्ही वृत्तपत्र पाहिले तर नक्कीच तुम्हाला योग्य ती नोकरी शोधण्यास मदत होईल. तसेच आज अनेक निरनिराळ्या साईट्स उपलब्ध आहेत जिथे नोकरीचा शोध तुम्ही घेऊ शकता. यातील बर्याच साईट्स मोफत सुविधा पुरवतात. अशा साईट्स वर तुमची माहिती देऊन अर्ज केल्यास तुम्हाला नक्कीच प्रतिसाद मिळेल.  ही माहिती देताना योग्य पद्धतीने द्या आणि तुमच्याबद्दल चुकीची माहिती देऊ नका. जर माहिती चुकीची असेल तर तुमची निवड होण्याच्या शक्यता कमी होतील. 

तुमचा बायो डेटा योग्य पद्धतीने तयार करा 

तुमचा बायोडेटा हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे आणि तो प्रभावशाली असणे गरजेचे आहे. तो जर तुम्ही नीट तयार केलात तर तुमचा प्रभाव नक्कीच पडेल. तो लिहिताना सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या आधी नजरेस पडणे गरजेचे आहे त्या सगळ्यात वर लिहा आणि कमी महत्वाच्या गोष्टी खाली लिहा. तुमचा अनुभव, कौशल्य या गोष्टींना अधोरेखित करा जेणेकरून वाचणार्याचे लक्ष तिथे सगळ्यात आधी जाईल. बायोडेटा बरोबर तुमच्या प्रमाणपत्राच्या प्रती अवश्य जोडा. 

मुलाखतीची तयारी 

अशा विविध उपयुक्त साईट्सवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अशा साईट्सवर अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध असतात आणि तुम्ही अर्ज केल्यास या पदासाठी तुमचा विचार केला जाऊ शकतो. अर्ज केल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. तुम्हाला मुलाखतीची तयारी उत्तम करायची आहे जेणेकरून त्या पदासाठी तुमची निवड होईल. मुलाखतीला जाताना साधे पण चांगले कपडे घालून जावे जेणेकरून प्रभाव पडेल. तिकडे विचारल्या जाणार्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे आत्मविश्वासाने द्या. बोलताना तुमचा स्वर नम्र असू द्या. स्वतःची माहिती योग्य पद्धतीने द्या जेणेकरून मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला तुमच्याबद्दल नीट माहिती होईल. काही वेळा फोनवरही मुलाखत घेतली जाते ज्यात तुम्ही योग्य कामगिरी केलीत तर तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीबरोबर अनेकदा क्षमताचाचणीही घेतली जाते. 

मराठी वक्ता या पदासाठी लागणारी पात्रता.  

उत्तम संवादकौशल्य –  उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम संवादकौशल्य असणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर तुमचे उच्चार स्पष्ट असायला हवेत आणि भाषा शुद्ध असायला हवी. तुम्ही तुमचे मुद्दे उत्तम पद्धतीने मांडू शकत असाल, त्यांचे वर्णन रंजक पद्धतीने करू शकत असाल तर या पदासाठी तुम्ही नक्कीच पात्र आहात. 

प्रभावी व्यक्तिमत्व – फक्त भाषा आणि संवाद नव्हे तर तुमचे व्यक्तिमत्वही तितकेच प्रभावशाली असणे गरजेचे आहे जेणेकरून बोलताना समोरच्या व्यक्तीवर उत्तम प्रभाव पडेल. तुमचे कपडे साधे आणि नीटनेटके असायला हवेत. तुमच्या व्यक्तिमत्वाचा जर समोरच्या व्यक्तीवर परीणाम झाला तर तुमची निवड होण्याची शक्यता जास्त असते.

योग्य ती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव-. मराठी वक्ता पदासाठी नोकर्या अनेक उपलब्ध आहेत आणि जर तुमच्याकडे पूर्वानुभव असेल तर नक्कीच तुम्हाला एक योग्य अशी नोकरी मिळू शकेल. या पदासाठी तुम्ही शैक्षणिक पात्रताही तितकीच महत्वपूर्ण आहे. तुमच्याकडे जर या क्षेत्रातील पदवी असेल तर ही नोकरी मिळणे तुम्हाला सोपे जाईल. जर तुम्हाला या पदावर काम करण्याचा अनुभव असेल तर नक्कीच त्याचा उल्लेख तुमच्या अर्जात करा कारण अनेक ठिकाणी अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाते. 

वेळेचे नियोजन- या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला योग्य ते वेळेचे नियोजन करता येणे आवश्यक आहे. जर उपलब्ध असलेल्या वेळेचा योग्य पद्धतीने वापर केला तर नक्कीच ते जमू शकेल. तुम्ही जेव्हा एखादे व्याख्यान देत असता तेव्हा उपलब्ध वेळात आवश्यक ते सगळे मुद्दे आणि विषय समाविष्ट होणे आवश्यक आहे आणि यासाठी वेळेचे नियोजन करता येणे गरजेचे आहे. 

 नोकरीसाठी अर्ज कसा  करायचा 

तुम्ही जर योग्य अशा नोकरीच्या शोधात असाल तर तुमचा शोध लवकरच संपणार आहे. निरनिराळ्या साईटवर जाऊन तुम्ही नोकरीच्या संधींचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही महाराष्ट्रात राहात असाल तर तुम्ही महाराष्ट्रातील नोकर्या शोधू शकता. अनेक साईट्स तुम्हाला योग्य त्या नोकरीपर्यंत पोहोचायला मदत करतात. या साईट्स वर जाऊन तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे, जो भरताना तुमची माहिती योग्य पद्धतीने लिहायची आहे. अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीकडून मेल येईल आणि म्हणूनच तुम्हाला नियमितपणे मेल चेक करणे गरजेचे आहे. जर तुमची निवड केली गेली तर तुम्हाला त्याबद्दल मेल पाठवला जाईल. 

योग्य ती माहिती द्या 

अर्ज करताना तुमच्याबद्दल खरी आणि योग्य अशी माहिती द्या जसे कि शिक्षण, अनुभव  वगैरे. कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात तेही स्पष्ट लिहा. सगळी माहिती लिहून झाल्यावर पुन्हा एकदा तपासा. योग्य ती माहिती दिल्यास तुमची निवड होण्याच्या शक्यता वाढतील. मिंटली सारख्या अनेक साईट्स वर तुमच्या बायोडेटाशी संबंधित नोकर्या असतात जेथे तुम्ही अर्ज करू शकता. 

अर्ज करताना काय ध्यानात ठेवाल?

अर्ज करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की तुमची माहिती देताना योग्य प्रकारे द्या. जर तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती आकर्षक पद्धतीने मांडलीत तर तुमची निवड होण्याच्या शक्यता वाढतात. तुम्ही कौशल्ये, अनुभव हे सगळ्यात आधी लिहा आणि बायोडेटा मध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टींचा उल्लेख करू नका. तसे केल्यास तुमच्या बायोडेटाचा प्रभाव पडणार नाही. 

Language