मार्केटींगची अशी धोरणे ज्याला गुंतवणुकीची गरज पडत नाही.

जेव्हा एखादी कंपनी नवीन असते तेव्हा त्या कंपनीकडे गुंतवणूक करायला जास्त पैसे नसतात. जर भांडवल गुंतवायला जास्त पैसे नसतील तर उत्तम अशा मार्केटिंग धोरणांचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होईल. तर पाहूया अशी कोणती धोरणे आहेत ज्यांचा वापर करून कंपनीला स्वतःची वाढ करता येईल तेही शून्य गुंतवणूक करून.

रेफरल्स

मार्केटिंग करताना अशा पद्धतीने करा की तुमचे ग्राहक स्वतःच तुम्हाला मार्केटिंगसाठी मदत करतील. एखाद्या व्यक्तीला त्याच्या मित्राने जर एखादे उत्पादन रेफर केले तर त्याचा प्रभाव नक्कीच जास्त पडतो. म्हणून रेफरल्स ना जास्त महत्व द्या. तुमच्या आत्ताच्या ग्राहकांना काही सवलती दिल्यात तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. किंवा जर तुम्ही तुमच्या ग्राहकांना रेफारल्ससाठी काही सवलती दिल्यात तर नक्कीच फायदा होईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही ग्राहकांना त्यांनी रेफर केलेल्या प्रत्येक व्यक्तीमागे काही पैसे किंवा सवलत देऊ केलीत तर ते जास्तीत जास्त ग्राहक तुम्हाला मिळवून देतील. अनेक वेगवेगळ्या अशा सवलती जाहीर केल्यात तर नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो. यांमुळे जास्तीत जास्त नवीन ग्राहक तुम्हाला मिळतील.

प्रेस रिलीज

लोक बातम्या नियमितपाने वाचतात, काही महत्वाची बातमी तुमच्याकडे असल्यास तर ती नक्की पोस्ट करा. त्यात तुमच्या ब्रांडचा उल्लेख केल्यास तुमचा ब्रांड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. कोणतेही पैसे खर्च न करता या पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त नवीन ग्राहक मिळवू शकता.

कंटेंट मार्केटिंग

हे निरनिराळ्या स्वरुपात उपलब्ध असून त्यात कोणत्याही गुंतवणुकीची गरज नसते. जर तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग सुरु केलात तर त्यात तुम्ही तुमच्या उत्पादनाची जाहीरात मोफत करू शकता. हा कंटेंट सगळ्यांपेक्षा वेगळा असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. जेव्हा तुम्ही हा कंटेंट लिहाल तेव्हा ही काळजी घ्या कि तो इतरांपेक्षा वेगळा असेल जेणेकरून तुमच्या साईटला जास्तीत जास्त ट्राफिक मिळेल. कंटेंट जर आकर्षक असेल तर नक्कीच तुमचा फायदा होईल.

एसइओ

जर तुम्ही हे तंत्र अवगत केलेत तर तुमच्या वेबसाईटला जास्तीत जास्त ट्राफिक मिळू शकेल. उत्तम आणि महत्वाचे असे कीवर्ड्स तुम्ही शोधून काढून त्यावर भर दिलात तर नक्कीच उपयोग होईल. कंटेंट लिहिताना तो उत्तम दर्जाचा आहे न याची खात्री मात्र नक्की करा. महत्वाचे असे कीवर्ड्स आणि लिंक वापरून तुम्ही तुमचा कंटेंट उत्तमरीत्या सदर करू शकता. यासाठी तुम्ही एखाद्या कंपनी कडून मदत घेऊ शकता. ते तुम्हाला असेल काही महत्वाचे कीवर्ड्स शोधून देतील ज्यामुळे तुम्ची साईट उठून दिसेल आणि तुमच्या साईटला जास्तीत जास्त युजर्स मिळतील.

सोशल मिडिया मार्केटिंग

सोशल मिडिया हे एक उत्तम आणि प्रभावी व्यासपीठ आहे. फेसबुकसारख्या व्यासपीठांवर तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहीरात मोफत करू शकता. कमी वेळात जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. तुमच्या मित्र समुदायाला या द्वारे माहिती करून देता येईल. येथे तुम्ही तुमच्या उत्पादनाची माहिती नीट करून देऊ शकता ज्यासाठी पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही.

इमेल मार्केटींग

कमीत कमी पैसे आणि वेळ खर्च करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे हे उत्तम आणि सोयीचे मध्यम आहे. यांत एकाच इमेल जास्तीत जास्त लोकांना पाठवून तुम्ही मार्केटींग करू शकता. एकाच वेळी अनेक लोकांना हा मेल पाठवल्याने तुमचे जास्तीत जास्त काम कमी वेळात होते. हा मेल तुम्ही मोबाईलवरूनही पाठवू शकता म्हणजेच तुम्हाला वेळ वेगळा काढण्याची गरज नाही, प्रवासातही तुम्ही तुमचे काम करू शकता, यासाठी तुमच्या टार्गेट ग्राहकांची यादी करा आणि फक्त त्यांनाच हा मेल पाठवा. जर त्यांना ती माहिती आवडली तर नक्की ते तुम्हाला संपर्क करतील. अशा प्रकारे कोणतेही पैसे खर्च न करता तुम्ही मार्केटींग करून तुमच्या उत्पादनाची माहिती जास्तीत  जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता. इमेल लिहिताना हे पहा कि जास्तीत जास्त महत्वाची माहिती त्यात दिली गेली असेल जेणेकरून लोकांना तुमचिया उत्पादनाची आणि तुमच्या कंपनीची संपूर्ण माहिती होईल.

पीपीसी

याचा अर्थ पे पर क्लिक असा होतो. प्रत्येक क्लिक मागे पैसे मिळण्याचे हे उत्तम माध्यम आहे. तुम्हीही अशा पद्धतीने पैसे मिलवू शकता. कमीत कमी वेळात जास्तीत  जास्त पैसे कमावण्याचे हे एक उत्तम साधन आहे.

वैयक्तीक ब्रांडिंग

हे प्रभावी पद्धतीने काम करते. यांत तुम्हाला स्वतःची जाहीरात योग्य त्या प्रकारे करायची असते आणि सोशल मीडियात कौशल्य प्राप्त करायचे असते. तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग लिहू शकता ज्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. यांमुळे तुमच्या साईटला जास्तीत जास्त ट्राफीक मिळेल. यांमुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि तसेच तुमच्या साईटला जास्तीत जास्त वाचक नक्कीच मिळू शकतात.

लिंक्डइन

या सारख्या साईट्सवर तुम्ही मोफत नोंदणी करू शकता जिथे तुम्ही जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलू शकता. येथे तुम्ही तुमचे वर्तुळ बनवू शकता.

फोरम्स आणि समूह

अनेक असे निरनिराळे समूह आणि फोरम्स असतात ज्याची मदत तुम्ही मार्केटींगसाठी घेऊ शकता. येथे तुम्ही स्वतःची माहिती आणि जाहीरात करू शकता. तुम्ही जर एखादा कार्यक्रम करत असाल तर त्याची जाहीरात अशा समूहात केलीत तर जास्तीत जास्त लोक ती पाहतील. या अशा समूहात सामील होण्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत आणि म्हणूनच हे एक उत्तम आणि प्रभावी साधन आहे ज्याद्वारे तुम्ही मार्केटिंग करू शकता.

जर तुमची कंपनी नवीन असेल आणि तुमच्याकडे जास्त भांडवल नसेल तर तुम्ही अशी काही मार्केटिंगची धोरणे वापरू शकता ज्यात कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नसते. एकही रुपया खर्च न करता तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून तुमच्या उत्पादनाची जाहीरात करू शकता. मार्केटींग करायचे म्हणजे खूप पैसे खर्च करायलाच हवेत असे काही नाही, त्याशिवायही तुम्ही मार्केटींग करू शकता. यासाठी गरज आहे तुमचा वेळ देण्याची. तुमचा वेळ खर्च करून तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. यांमुळे तुम्ही तुमची कंपनी आणि उत्पादन कमीत कमी वेळात लोकप्रिय करू शकता.