मुंबई येथे असलेल्या सर्वोत्तम नोकर्या 

मुंबई येथे असलेल्या सर्वोत्तम नोकर्या 
Tejashree
Fri, 09/13/2019 – 07:00

मुंबई येथे असलेल्या सर्वोत्तम नोकर्या 

 

मुंबई, देशाची आर्थिक राजधानी, सर्वात प्रगत शहरांपैकी एक. ह्या शहरात सगळ्यांनाच आसरा मिळतो. येथील औद्योगिक प्रगतीने अनेक नवीन नोकर्यांना जन्म दिला आहे. येथे अनेक नवनवीन संधी रोजच उपलब्ध होत आहेत. हे असे शहर आहे जे सातत्याने प्रगती करते. योग्य पद्धतीने जर तुम्ही नोकरी शोधलीत तर नक्कीच येथे तुम्हाला योग्य अशी नोकरी मिळू शकते. येथे विविध क्षेत्रातील नोकर्या उपलब्ध आहेत आणि तुमच्या बायोडेटाशी मिळतीजुळती नोकरी तुम्ही येथे नक्कीच शोधू शकता. 

आयटी क्षेत्र 
हे क्षेत्र सध्या वेगाने विस्तारते आहे. प्रतीदिन बदलत आणि प्रगत होत जाणार्या या क्षेत्रात अनेक चांगल्या अशा नोकर्या उपलब्ध आहेत. या नोकर्यांसाठी आयटी क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. 
फायनान्स 
हे क्षेत्र सुद्धा वेगाने आपले पंख पसरते आहे.  यांत अनेक संधी उपलब्ध आहेत जसे की अकौंटंट, चार्टर्ड अकौंटंट, फायनान्स अधिकारी, खजिनदार, कॉस्ट अकौंटंट वगैरे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता लागू आहे. 

सेल्स 
हे क्षेत्र सध्या खूप जोरात आहे. यात अनेक संधी उपलब्ध असून विविध पदांवर कामे करता येऊ शकतात. सेल्स असिस्टंट, सेल्स अधिकारी, सेल्समन, सुपरवायजर, सेल्स एक्सेक्यूटीव अशा अनेक या क्षेत्रात उपलब्ध असून यांसाठी सेल्समध्ये दीर्घ अनुभव तसेच शैक्षणिक पार्श्वभूमी असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात वाढ आणि प्रगतीला बराच वाव असल्याने बरेच जण या क्षेत्रात जाताना दिसतात. यात वाढीची खूप संधी असून फक्त पगारच नाही तर वेगवेगळी आकर्षक इन्सेटीवही मिळू शकतात. यांत नोकरी मिळवायची असेल तर अनेक साईट्स त्यासाठी उपलब्ध आहेत.
स्वागतकक्ष

रीस्पेशनीस्टच्या नोकरीला हल्ली खूप मान आहे. मोठमोठ्या कंपनीत या पदावर उत्तम पगार असतो. यासाठी तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असणे गरजेचे आहे तसेच तुम्हाला सामान्य ज्ञान असावे.उत्तम संवादकौशल्य जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच ह्या पदावर काम करू शकता. यात नोकरीत बराच वाव आणि वाढ होण्यास संधी आहे. 

आरोग्य 
या क्षेत्रात सध्या खूप वाव आहे. जर तुमच्याकडे वैद्यकीय पदवी असेल तर अनेक संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. अनेक हॉस्पिटल तसेच आरोग्य केंद्रे येथे नवनवीन संधी उपलब्ध आहेत ज्यांचा नक्कीच तुम्ही फायदा घेऊ शकता. 
लेखन 

सध्या इंटरनेटचा वापर बर्याच प्रमाणावर होतो. जवळपास प्रत्येक माणूस हा मोबाईलवरील इंटरनेट वापरतो, वेबसाईट वाचतो आणि म्हणून लेखनात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. कंटेंट रायटर, कंटेंट म्यानेजर अशा अनेक पदांवर तुम्ही काम करू शकता. तुम्हाला उत्तम लेखनकला अवगत असेल तर तुम्ही नक्कीच वेबसाईट साठी लिहू शकता. यांत फूल टाईम तसेच पार्ट टाईम अशा विविध संधी उपलब्ध आहेत. हे काम तुम्ही फ्रीलांसर म्हणून तुमच्या घरातून ही करू शकता. फक्त कंटेंट रायटरच नव्हे तर प्रुफ रीडिंग तसेच अनुवादाचीही कामे तुम्ही घेऊ शकता. 

शिक्षण क्षेत्र

विद्यादान हे सगळ्यात पवित्र दान आहे. या क्षेत्रात अगणित अशा संधी उपलब्ध आहेत. बालवाडीच्या मुलांना शिकवण्यासाठी एक कोर्स पूर्ण करावा लागतो त्यांनतर तुम्ही या मुलांना शाळेत शिकवू शकता. जर तुम्हाला मोठ्या वर्गातील मुलांना शिकवायचे असेल तर त्यासाठी संबंधित पदवी परीक्षा तुम्हाला पास करावी लागते आणि त्यानंतर तुम्ही शाळेत शिकवू शकता. फक्त शाळाच नाही तर प्रायवेट क्लासमध्ये शिकवण्यातही खूप मोठा वाव आहे. 

हॉटेलिंग 

सध्या हे क्षेत्र खूप प्रसिद्ध होत आहे. नवनवीन फूड जॉइंटमध्ये आजकाल आपण फार गर्दी पाहतो. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण घेणे जरुरीचे आहे. त्यांनतर तुम्ही एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये काम करू शकता. या क्षेत्रात वाढ व्हायला खूप वाव आहे. 
कला
आपल्या संस्कृतीत एकूण चौसष्ट कलांचा समावेश आहे. तुम्ही जर गायन ,वादन किंवा नृत्य यात रुची ठेवून असाल तर तुम्ही नक्की या क्षेत्रात नोकरी मिळवू शकता. तुमच्याकडे जर या क्षेत्रातील शिक्षण आणि अनुभव असेल तर तुम्हाला अनेक संधी उपलब्ध आहेत. खूप वाव आहे.
संशोधन 

या क्षेत्रातही खूप वाव आहे. अनेक विषयात संशोधन करून तुम्ही उत्तम कामगिरी बजावू शकता.

मिडिया
जर तुमच्याकडे आकर्षक व्यक्तिमत्व आणि उत्तम संवादकौशल्य असेल तर तुम्ही नक्कीच मिडिया मध्ये काम करू शकता. एक उत्तम पत्रकार बनून तुम्ही नावारूपाला येऊ शकता. यासाठी पत्रकारितेची पदवी तसेच कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात अनेक नवीन संधी रोजच तयार होत  आहेत. 

बँकिंग
बँकेचे क्षेत्र हल्ली खूप वाढत आहे. नवनवीन बँकांच्या स्थापनेमुळे अनेक नवीन नोकर्या उदयास येत आहेत. ह्या नोकर्या मिळवण्यासाठी तुम्हाला बँकेची परीक्षा पास होणे आवश्यक आहे. पेपरमध्ये जाहिराती पाहून तुम्ही या परीक्षांना बसु शकता. या परीक्षांसाठी काही वर्गही घेतले जातात. जर तुम्ही ही परीक्षा पास झालात तर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाते. अनेक अशा साईट्स आहेत जेथे तुम्हाला अशा नोकर्या किंवा परीक्षा यांची माहिती मिळू शकते. 

मुंबई येथे अनके नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला योग्य ती नोकरी मिळवायची असल्यास अनेक अशा साईट्स आहेत जीथून तुम्ही नोकरी मिळवू शकता किंवा अन्य स्त्रोतांतुन नोकरी तुम्हाला मिळू शकते. अशा साईट्स वर नोकरीचा शोध तुम्ही घेऊ शकता किंवा ज्यासाठी अर्ज तुम्ही करू शकता. 

 

Language