शैक्षणिक सल्लागार कामाचे स्वरूप, मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि काही महत्वाच्या टिप्स

हल्ली खूप स्पर्धा असून विद्यार्थ्यांना नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. नक्की कोत्या क्षेत्रात जायचे, त्यासाठी काय करायचे याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम असतो. अशा वेळी जर कोणी त्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन दिले तर त्यांचा फायदा होईल. शैक्षणिक सल्लागार या पदाला फार महत्व प्राप्त झाले आहे. शैक्षणिक सल्लागार हे विद्यार्थ्यांना योग्य त्या कोर्सेसची संपूर्ण माहिती देतात आणि नवनवीन संधी कशा मिळवता येतील याबद्दल मार्गदर्शन करतात. आता आपण पाहूया की शैक्षणिक सल्लागार कामाचे स्वरूप काय असते ते.

कामाचे स्वरूप

यांत फक्त सल्ला नव्हे तर प्रशिक्षणाचाही समावेश होतो. विद्यार्थ्यांना नवीन कोर्सेस, नवीन संधी, तसेच नवीन तंत्रज्ञान यांची माहिती करून देणे हे शैक्षणिक सल्लागाराचे मुख्य काम असते. विद्यार्थी तसेच शिक्षक यांचे निरनिराळ्या विषयांवर सर्वे घेणे आणि परीक्षण करणे हेही एक महत्वाचे काम आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काही महत्वाची धोरणे तयार करून त्यांचा अवलंब करणे हे महत्वाचे या पदावरील व्यक्तींचे कार्य आहे.

काही महत्वाच्या भूमिका

 • शिक्षकांसाठी नवनवीन कार्यशाळा तसेच शिबिरे, वगैरे आयोजित करणे

 या शिबिरांत नवनवीन गोष्टींची माहिती शिक्षकांना  देता येते आणि म्हणून असे आयोजित करणे आवश्यक आहे

 • ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार करणे

हल्लीच्या धावपळीच्या युगात शिक्षण किंवा इतर गोष्टींसाठी जास्त वेळ देणे सगळ्यांना शक्य होईलच असेल नाही. अशा वेळी स्वतःच्या  सोयीने शिक्षण घ्यायचे असेल तर ऑनलाईन शिक्षण हा उत्तम पर्याय आहे. तुमचा वेळ आणी पैसा यांत ववाचतोच  तसेच तुमच्या सोयीप्रमाणे शिक्षण घेण्याचा पर्याय नक्कीच जास्त योग्य आणि सोयीचा आहे.

 • विद्यार्थ्यांना योग्य कॉलेज, तसेच योग्य तो कोर्स निवडायला मदत करणे

विद्यार्थ्यांना योग्य कोर्स, योग्य कॉलेज, शोधायला मदत करणे, इतकेच नाही तर त्यासाठी अर्ज भरायचे मार्गदर्शन करणे हे मुख्य काम हे सल्लागार करत असतात. अनेक विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने अर्ज कसा भरायचा हे  माहिती नसते. नक्की अर्ज कसा भरायचा, चुका कशा टाळाव्यात, त्यात काय लिहायचे हे जर तुम्ही त्यांना समजावून सांगितलेत तर त्यांचे काम अधिक सोपे होईल यांत काही शंकाच नाही.

विविध प्रकारचे सल्लागार

हल्ली विविध प्रकारचे सल्लागार असतात. केवळ शैक्षणिकच नाही तर हल्ली निरनिराळ्या प्रकारचे सल्लागार कार्यरत असतात.

शाळा सल्लागार

आजकाल शाळेत असे सल्लागार नियुक्त केले जातात जे अभ्यासक्रम आणि शिक्षण याचे परीक्षण करतात. हे सल्लागार काही शैक्षणिक कार्यशाळा तसेच कार्यक्रमांचे आयोजन करतात. नवनवीन उपक्रम ते राबवतात जेणेकरून संस्थेचा शैक्षणिक दर्जा उंचावेल. विद्यर्थ्यांना काही अडचणी असल्यास त्याचे निराकरण हे करू शकतात.

वैयक्तिक सल्लागार

हे वैयक्तिक पातळीवर काम करतात. विद्यार्थी  तसेच त्यांच्या घरच्यांना सल्ला देणे हे काम हे सल्लागार  करतात. विद्यर्थ्यांना योग्य असे शैक्षणिक वातावरण मिळवून देणे हे काम ते करतात.

सरकारी सल्लागार

काही सल्लागार हे विविध प्रोजेक्ट्स तसेच पुस्तक प्रकाशन या संदर्भात काम करतत. उत्तम दर्जाचे चांगले शैक्षणिक उत्पादन तयार करण्याचे काम ते करतात. नवनवीन माहिती ते गोळा करतात.

अर्हता

सल्लागार होण्यास्तही तुमच्याकडे कोणत्याही क्षेत्रातील पदवी असणे गरजेचे आहे. असेच या क्षेत्रातील पदवी किंवा पदविका तुम्ही मिळवली असेल तर तुमचा फायदा आहे.

या क्षेत्रात आवश्यक असलेले गुण

 • निर्णय घेण्याची क्षमता
 • बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणे
 • उत्तम नियोजन करण्याची क्षमता

शैक्षणिक सल्लागारांची महत्वाची कार्ये

 • विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्याशी महत्वाच्या विषयांमध्ये  चर्चा करणे. त्यंच्या संपर्कात राहणे

विद्यार्थी आणि पालक यांच्यात संवाद आणि समन्वय हे महत्वाचे कार्य आहे.

 • काम वेळेत पूर्ण करून त्याचा अहवाल तयार करणे

आपल्या कामाचा अहवाल वेळोवेळी तयार करून तो सादर करणे/

 • अभ्यासक्रम तयार करणे

नवनवीन आणि अद्ययावत अभासक्रम तयार करणे हे सल्लागार या पदाचे मुख्य कार्य आहे. शिक्षकांशी चर्चा करून नवीन धोरणे तयार करणे आणि त्यांचा अवलंब करणे हे ही एक आवश्यक  कार्य आहे. अभ्यासक्रम हा नवीन शिक्षण दर्जाप्रमाणे  आहे की नाही याची खात्री करणे हेही एक कार्य आहे.

 • शिक्षकांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या कार्याचे निरक्षण करणे

शिक्षकांवर हे सल्लागार लक्ष  ठेवतात आणि त्यांच्या कार्यपद्धतीचे  निरीक्षण करतात. त्यांच्या शिकवायच्या शैलीत त्यांना आवश्यक त्या सुधारणा सुचविणे. त्यांना नवनवीन तंत्रज्ञानाह्ची माहिती देणे हे ही सल्लागाराचे मुख्य कार्य आहे.  

 •  योग्य प्रशिक्षण देण्यासाठी  निरनिराळे कोर्सेस तयार करणे

ऑनलाईन कोर्सेस निर्माण करून लोकांना ते उपलब्ध करून देणे. शिक्षकांना काही शंका असतील तर त्यांचे निराकरण करणे. योग्य पद्धतीने ते शिकवत आहेत याची खातरजमा करून घेणे ही सुद्धा शैक्षणिक सल्लागारची महत्वाची कामे आहेत.

सल्लागार म्हणून काम करताना काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात. त्यापैकी काही खाली नमूद केले आहेत.

 • एक असा अनुभव सांगा ज्यात तुम्ही तुमची प्रशिक्षण कौशल्ये वापरली असतील, , किंवा अशी एक पद्धत  वापरली असेल ज्यात तुमच्या  कौशल्यांचा कस लागला.

यांत तुम्हाला तुमच्या अनुभावांबाबत सांगायचे आहे. तुम्ही तुमची  कौशल्ये कोणत्या पद्धतीने वापरलीत  हे योग्य पद्धतीने समजावून सांगितले तर त्याचा फायदा  होऊ शकतो.

 • एका अशा शिक्षक प्रशिक्षण प्रोग्राम बद्दल सांगा जो तुम्ही आयोजित केला असेल किंवा ज्यात तुम्ही एक महत्वपूर्ण  भूमिका निभावली असेल.

अनेक नवनवीन शैक्षणिक प्रोग्राम हल्ली निघत आहेत त्याबद्दल माहिती तुम्ही देऊ शकता

 • अशी एक वेळ सांगा जेव्हा तुम्ही प्रशासनाला योग्य तो सल्ला दिलात

तुम्ही जर कोणत्याही प्रसंगी प्रशासनाला सल्ला दिला असेल आणि त्याचा त्यांना फायदा झाला असेल तर नक्की त्याबद्दल सांगा.

 • एक असे उदाहरण सांगा ज्यात तुमच्या कंपनीत तुमच्यामुळे सुधारणा झाली असेल..

जर तुमची संस्था किंवा कंपनी यांत तुमच्या प्रयत्नांनी  काही सुधारणा झाली असेल तर त्याचा उल्लेख जरूर करा. प्रयत्न कोणत्या प्रकारे आणि कसे केले गेले याची माहिती नक्की द्या.

 • एक असा अनुभव सांगा ज्यात तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचा  शैक्षणिक गरजा ओळखल्यात आणि त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिलेत.

जर तुम्हाला सल्ला देताना असे वाटले की काही तुमच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आहेत आणि तुम्ही त्यांना योग्य तो सल्ला दिलात तर हे नक्की  सांगा की काय सल्ला दिला गेला आणि त्याचा अवलंब कसा केला गेला.

 • तुम्ही दिलेल्या प्रशिक्षणाचा काय फायदा तुमच्या विद्यार्थ्यांना  झाला

जर तुम्ही विद्यार्थ्यांना काही प्रशिक्षण दिले असेल तर त्याबाबत त्यांना प्रश्न विचारा. त्यांना त्यातून काय फायदा झाला काय काय शिकायला मिळाले याची विचारणा जरूर करा.

 • तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन कसे करता

तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन नक्की कसे करता तसेच तुमच्याकडे असलेल्या वेळेचे नियोजन कसे करता करता  हे महत्वाचे आहे कारण वेळेचे नियोजन हे फार मह्त्वाचे असते.

 • एक असा अनुभव सांगा ज्यात तुम्ही अद्ययावत  तंत्रज्ञानाचा वापर केला असेल

जर तुम्ही अद्यायवत तंत्रज्ञान वापरून एखादी परीक्षा घेतली असेल किंवा तत्सम काही गोष्टी केल्या असतील तर त्यांची माहिती द्या. माहिती देताना सविस्तर रुपात देणे आवश्यक आहे.

 • तुम्हाला सल्लागार का व्हायचे आहे

हा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. याचे उत्तर काळजीपूर्वक द्या. तुमचे स्वारस्य यांत का आहे हे सांगताना तुमच्या कौशल्यांचा उल्लेख करा आणि तुम्ही ती अमलात कशी आणणार  हे थोडक्यात सांगा.यांत शैक्षणिक सल्लागाराचा पगार याबद्दल नक्की नमूद करा. या क्षेत्रात तुम्हाला का यायचे आहे याचा उल्लेख नक्की करा. या क्षेत्रात खूप वाढ आणि विकासाला वाव असल्याने तुम्ही नक्की याचा विचार करू शकता.