सेल्समधील करीयरमध्ये तुमची प्रगती का होत नाहीये ?

सेल्स हे असे एक क्षेत्र आहे ज्यात वाढ आणि प्रगतीला खूप वाव आहे. यात पैसेही बरेच मिळतात. पण तरीही काही वेळा असे होते की या क्षेत्रात तुमची प्रगती थांबते आणि वाढ होताना दिसत नाही.असे होते की तुम्ही आहे तिथेच आहात आणि पुढे गेला नाहीत. का बरे असे होते ? काय असतील ती करणे ?  तर चला पाहूया ती काय कारणे आहेत ती.

वेळेचे महत्व नसणे

वेळेचे महत्व तुम्हाला जाणता  यायला हवे जर तुम्ही या क्षेत्रात कार्यरत असाल. जा तुम्हाला योग्य वेळी काम पूर्ण करण्याचे  महत्व समजत नसेल तर तुमची या क्षेत्रात अधोगती होऊ शकते. प्रत्येक ग्राहकाला गोष्टी वेळेत पूर्ण करून हव्या असतात आणि जर तुम्ही वेळेत काम पूर्ण केले नाहीत तर तुमची प्रगती तेथे थांबेल.वेळेचे महत्व याचा अर्थ असा नाही की तुम्ही चोवीस तास फक्त काम करायला हवे, पण योग्य वेळी योग्य ते काम पूर्ण करून तुम्ही तुमचा विकास साधू शकता.

योग्य नियोजनाचा अभाव

हे सगळ्यात महत्वाचे कारण आहे. तुमच्या कामाचे तुम्ही योग्य  प्रकारे आणि योग्य वेळेत पूर्वनियोजन जर केले नाहीत तर तुमचा गोंधळ होईल आणि कामात चुका होतील. यामुळे तुमची वाढ आणि विकास थांबेल.

नकारात्मक दृष्टीकोन ठेवणे

जर काम करताना तुम्ही नकारात्मक दृष्टीकोन ठेवलात तर तुमची प्रगती तेथेच थांबेल. जर तुमचे विचार नकारात्मक असतील तर तुमचे काम नीट पूर्ण होऊ शकणार नाही. सुरुवातीच्या काळात सकारात्मक दृष्टी ठेवणे फार अवघड असते पण तरीही तसा प्रयत्न मात्र जरूर झाला पाहिजे. जरी या क्षेत्रात खूप स्पर्धा असली तरी त्याला घाबरून न जाता तुम्ही तुमचे काम सुरु ठेवले पाहिजे. नकार पचवण्याची ताकत तुमच्यात असायला हवी.जरी नकार मिळत गेले तरीई त्याने डगमगून जाता कामा नये. काम करताना कितीही अडथळे आले तरी तुम्ही पाउल मागे नाही घेतले पाहिजे.

निकृष्ठ कामाचे धोरण

काम करताना त्याचे योग्य असे धोरण ठरवणे आवश्यक असते. जर ते उ.त्तम दर्जाचे नसेल तर तर तुमची अधोगती अटळ आहे. काम करताना तुमचे योग्य असे धोरण तुम्ही निश्चित केले पाहिजे. यांमुळे तुम्हाला काम करताना प्रेरणा मिळेल. तुम्हाला या क्षेत्रात काम करताना भरपूर मेहनत घ्यायला हवी. जर तुम्ही योग्य मेहनत घेतलीत तर तुमची वाढ आणि विकास होईल. यांमुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

कमी जनसंपर्क

या क्षेत्रात जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्हाला खूप लोकांशी संपर्क ठेवायला हवा. जर तुमचा जनसंपर्क कमी असेल तर तुमची प्रगती होणार नाही. अनेक लोकांशी सतत संपर्क साधलात तर तुमच्या व्यवसायाची वाढ चांगल्या प्रकारे होईल. तुमचे हितसंबंध चांगले असणे आवश्यक आहे, तास नसल्यास तुमची प्रगती थांबेल. जर तुमचे हितसंबंध योग्य असतील तर तुमचा उत्साह वाढेल आणि काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल. कोणतेही संबंध तोडायला वेळ लागत नाही पण जोडायला बराच काळ  लागतो, तसेच टिकवायलाही बराच काळ लागतो.

आत्मविश्वासाचा अभाव

जर तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव असेल तर तुमची प्रगती कधीही होणे शक्य नाही. जर तुमचाच स्वतःवर विश्वास नसेल तर तुमचे ग्राहक तुमच्यावर कसा काय विश्वास ठेवतील ? काम करताना तुम्हाला तुमच्या उत्पादन आणि सेवांची योग्य आणि संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. जर योग्य आणि पूर्ण माहिती नसेल तर तुम्हाला काम करणे कठीण जाईल.म्हणून योग्य पद्धतीने काम करा आणि तुमची प्रगती तुम्हीच साधा.

प्रामाणिकपणा नसणे

फक्त सेल्सच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात काम करताना तुम्हाला प्रामाणिक असणे गरजेचे आहे. जर हा गुण तुमच्यात नसेल तर तुमची वाढ होणे कठीण आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे  काम केलेत तर नक्कीच तुमचा फायदा होईल. तुम्ही यात सत्य बोलणे आणि त्याप्रकारे वागणे खूप आवशयक आहे. असे केल्यास तुम्हाला तुमचा विकास नीट साधता येऊ शकतो.

संपूर्ण तयारी नसणे

जर तुमची संपूर्ण तयारी आणि अभ्यास नसेल तर तुमची वाढ होणार नाही. काम करताना संपूर्ण तयारी करणे गरजेचे असते. काम करताना त्याची संपूर्ण तयारी असणे गरजेचे असते अन्यथा तुमचा गोंधळ वाढेल आणि तुमचे काम नित पूर्ण होणार नाही.

अनुभवाचा योग्य वापर न करणे

सेल्स हे एक असे क्षेत्र आहे ज्यात तुम्हाला असलेला अनुभव खूप महत्वपूर्ण भूमिका निभावतो. तुम्हाला नुसता अनुभव असून उपयोग नाही तर त्याचा योग्य वापर कुठे आणि कसा करायचा याची समज असणे फार आवशयक आहे, जर ही  समज नसेल तर तुमची योग्य ती प्रगती या क्षेत्रात होऊ शकत नाही. तुम्हाला असलेले ज्ञान आणि अनुभव यांचा योग्य तो वापर कसा करायचा हे पाहून घेणे आवश्यक असते.

नवीन शिक्षण आणि कल्पना यांचा अभाव

हे क्षेत्र असे आहे ज्यात रोज काहीतरी नवीन येत असते आणि त्याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. जr ही माहिती नसेल तर तुमची प्रगती होऊ शकणार नाही. नवनवीन संकल्पना तुम्हाला माहिती नसतील तर तुमची वाढ होणार नाही.

वेळेचे योग्य नियोजन नसणे

तुम्ही या क्षेत्रात जेव्हा काम करता तेव्हा तुमच्याकडे असलेल्या वेळेचा तुम्हाला योग्य तो उपयोग करता आला पाहिजे. जर तुम्ही तसे नाही केलेत तर तुमची प्रगती होणार नाही. तुमच्याकडे असलेला वेळ फुकट घालवला तर तुमची प्रगती होणार नाही. तुम्ही तुमच्या वेळेचे योग्य पद्धतीने नियोजन केलेत तर नक्कीच तुमची वाढ योग्यरित्या होईल.

कल्पकतेचा योग्य वापर न करणे

तुम्हाला या क्षेत्रात जास्तीत जास्त कल्पक होऊन काम करणे गरजेचे असते. तुम्ही तुमच्यातील कल्पकतेचा वापर नीट केला नाहीत तर तुमची वाढ योग्य प्रकारे होणार नाही. तुमची प्रगती थांबेल.

सेल्स हे असे एक क्षेत्र आहे ज्यात रोज नवनवीन बदल होतात, तसेच नवनवीन घटना रोज घडत असतात. अशा वेळी तुमची प्रगती योग्य पद्धतीने साधणे तुम्हाला आवशयक आहे.